नेवासा/प्रतिनिधी
मुळा उजवा कालव्याच्या लाभ क्षेत्रातील लघुवितरीकास्तरीय पाणी वापर संस्थांच्या व्यवस्थापन समिती संचालक मंडळाचे कार्यकाल संपल्यामुळे सन २०२३ ते २०२९ या कालावधीकरिता सर्व लघुवितरीकास्तरीय पाणी वापर संस्थांच्या संचालक पदासाठी निवडणूक घेण्याचे प्रस्तावित असल्याने प्रारूप मतदार यादी प्रसिद्धि कार्यक्रम जाहिर करण्यात आला असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता कु.सायली पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र सिंचन पद्धतीने शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम २००५ व नियम २००६ अन्वये मुळा पाटबंधारे विभाग, अहमदनगर यांचे कडून निवडणूक प्रारूप मतदार यादी प्रसिद्धि कार्यक्रम जाहिर केला आहे.
*५०० हेक्टरच्या आतील पाणी वापर संस्था मतदार संचालक संख्या अशी…*
——————————————–
अ. क्र.–मतदार संघ—सर्वासाधाण संचालक– महिला संचालक– एकूण संख्या
——————————————–
१) संस्थेचा सुरुवातीचा (शीर्ष) भाग–२–१–३
२) संस्थेचा मधला (मध्य) भाग–२–१–३
३)संस्थेचा शेवटचा (अंतिम) भाग–२–१–३
——————————————–
एकूण–६–३–९
——————————————–
*५०० हेक्टरच्या वरील पाणी वापर संस्था मतदार संघ व संचालक संख्या अशी…*
——————————————-
अ. क्र.—मतदार संघ–सर्वासाधाण संचालक– महिला संचालक– एकूण संख्या
——————————————–
१) संस्थेचा सुरुवातीचा (शीर्ष) भाग–३–१–४
२) संस्थेचा मधला (मध्य) भाग–३–१–४
३)संस्थेचा शेवटचा (अंतिम) भाग–३–१–४
——————————————–
एकूण–९–३–१२
——————————————–
*असा आहे मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम…*
——————————————-
क्र.-तपशील–दिनांक–वेळ–ठिकाण
——————————————–
१)मतदार याद्या तयार करणे–
दि.१५ ते २४ मार्च २०२३–स.१० ते ५–संबंधीत शाखा कार्यालये.
२)मतदार याद्या प्रसिद्ध करणे व
हरकती मागविणे–दि.२७ मार्च २०२३–स.१० ते ५ –संबंधीत शाखा कार्यालये.
३) हरकती स्वीकारणे–दि.२८ ते ३१ मार्च २०२३–स.१० ते ५–संबंधीत शाखा कार्यालये.
४) हरकती निकाली काढणे–
दि.१ ते १६ एप्रिल २०२३–स.१० ते ५ –संबंधीत शाखा कार्यालये
५) प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे–दि.२४ एप्रिल २०२३– स.१० ते ५–संबंधीत शाखा कार्यालये.
६)प्रारूप मतदार यादीवर वरिष्ठ कार्यालयात अपिल करणे–दि.२ मे २०२३–स.१० ते ५ — संबंधीत शाखा कार्यालये.
७)अपिलीय अधिकाऱ्याचा निर्णय–
दि.३ ते १० मे २०२३–स.१० ते ५ — संबंधीत शाखा कार्यालये.
८)अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे–दि.१५ मे २०२३–स.१० ते ५ — संबंधीत शाखा कार्यालये.
*थकबाकीदार सभासद निवडणुकीस अपात्र…*
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 33 (1) (ग) नुसार पाणी वापर संस्थेचे सभासदांकडे पाणी पट्टीची थकबाकी असेल तर असे सभासद पाणी वापर संस्थेच्या व्यवस्थापन समितीचा संचालक म्हणून निवडणूक लढविण्यास अपात्र ठरणार आहेत.
*थकबाकीदार पाणी वापर संस्थेचा विद्यमान संचालक ही निवडणुकीस अपात्र…*
तसेच ज्या पाणी वापर संस्थेकडे पाणी पट्टीची थकबाकी असेल, त्या संस्थेच्या विद्यमान संचालक मंडळातील सदस्य देखील निवडणूक लढविण्यास अपात्र ठरणार आहे.
पाणी पट्टी थकबाकी ही अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याच्या पूर्वी भरणे बंधनकारक आहे. अधिनियम 2006 मधील प्रकरण 2 नियम 7 (10) नुसार निवडणूक निधी म्हणून प्रत्येक पाणी वापर संस्थेने रक्कम रुपये 35000/- संबंधीत शाखा कार्यालयामध्ये अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याच्या तारखेपूर्वी भरणे अनिवार्य आहे.
उपविभागीय अधिकारी राहुरी, उपविभागीय अभियंता घोडेगाव, उपविभागीय अधिकारी नेवासा, उपविभागीय अभियंता चिलेखनवाडी, उपविभागीय अधिकारी अमरापूर यांची त्यांचे कार्यक्षेत्रासाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे असे मुख्य निवडणुक अधिकारी कु.सायली पाटील यांनी सांगितले.