Tuesday, November 30, 2021

पंतप्रधान मोदींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लखनऊमध्ये जीएसटी कौन्सिलची बैठक पार पडली. या बैठकीनंतर केंद्र सरकारने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जीएसटी प्रणाली सुधारणांवर मंत्र्यांचा एक गट तयार केला आहे. उपमुख्यमंत्री पवार हे

या मंत्रिगटाचे संयोजक असतील.  वस्तू आणि सेवा करप्रणालीतील त्रूटी दूर करुन ती सहज, सोपी करण्यासंदर्भात या मंत्रिगटाकडून सुधारणा सुचवण्यात येतील. दरम्यान, अजित पवार यांना केंद्रानं संयोजक केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झालीय. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस

जवळ येत असल्याचा अंदाज या निमित्ताने वर्तवला जात आहे. महत्त्वाच्या समितीचे संयोजक पद अजित पवारांना दिल्यामुळे भाजप-राष्ट्रवादी एकमेकांना टाळी देतेय का अशा चर्चाही सुरू झाल्या आहेत.

अजित पवारांची समिती काय काम करणार?
– टॅक्स अधिकाऱ्यांकडील उपलब्ध साधनं आणि इंटरफेसचा आढावा घेईल
– राज्य आणि केंद्रीय कर रचनेत चांगला समन्वय स्थापन करणं
– व्यवसायाच्या प्रक्रियेतील बदलांसह, महसूल गळती रोखण्याचे काम करेल
– चोरीचे संभाव्य स्त्रोत ओळखण्यासह प्रणालीला अधिक प्रभावी आणि कार्यक्षम बनवण्यासाठी उपाय सुचवेल

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या मंत्रिगटात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला, आंध्र प्रदेशचे अर्थमंत्री बग्गाना राजेंद्रनाथ, आसामचे अर्थमंत्री अजंटा निओग, छत्तीसगडचे व्यापार करमंत्री टी. एस. सिंगदेव, ओडीसाचे अर्थमंत्री निरंजन पुजारी, तामिळनाडूचे अर्थमंत्री डॉ. पलानीवेल थैगाराजन यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!