Tuesday, November 30, 2021

नगर.ब्रेकींग:उसणवारीच्या पैशातून मित्रानेच केला मित्राचा खून अखेर झाला न्याय

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:खूनाच्या गुन्ह्यात दोषी असलेल्या एकाला येथील जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. कृष्णा रघुनाथ गायकवाड (वय 30 रा. सावेडी, मुळ रा. तेलकुडगाव ता. नेवासा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा न्यायाधीश एम. आर. नातु यांनी हा निकाल दिला.

20 जून 2019 रोजी आरोपी गायकवाड याने त्याचा मित्र योगेश बाळासाहेब इथापे (रा. नगर) यांचा खून केला होता.नगर-मनमाड रोड मयत योगेशचे वडिल बाळासाहेब अंबादास इथापे यांची चहाची टपरी असून तेथे जवळच पद्मावती पेट्रोलपंपावर कृष्णा गायकवाड याचे पंक्चरचे दुकान आहे. कृष्णा व योगेश यांची मैत्री होती.

या मैत्रीमुळे योगेश याने कृष्णाला घरबांधणीसाठी एक लाख रूपये हातउसणे दिले होते. योगेशने कृष्णाकडे या पैशाची मागणी केल्यास तो जीवे ठार मारण्याची धमकी देत होता.20 जून 2019 रोजी रात्री बाळासाहेब व त्यांचा मुलगा योगेश चहाच्या टपरीवर काम करत होते. त्यावेळी योगेशनने कृष्णाचे पंक्चर दुकान उघडे आहे,

मला पैशाची गरज आहे, असे बाळासाहेब यांना सांगितले व तो कृष्णाकडे गेला. कृष्णा व योगेश यांच्यात भांडण होईल याची शंका बाळासाहेब यांना आल्याने ते योगेशच्या पाठीमागे गेले. त्यावेळी कृष्णा हातातील टॉमीने योगेशला मारहाण करत होता. बाळासाहेब यांनी कृष्णाला अडविण्याचा प्रयत्न केला असता

त्यांना ढकलून दिले व योगेशवर कोयत्याने वार केले. मारहाणीनंतर कृष्णा घटनास्थळावरून पसार झाला. जखमी योगेश याला उपचारासाठी नगर शहरातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. योगेशवर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी मयत योगेशचे वडिल बाळासाहेब इथापे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कृष्णा गायकवाड विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सुरूवातीला पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील व त्यानंतर पोलीस निरीक्षक एच. पी. मुलाणी यांनी केला.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!