Wednesday, December 8, 2021

नगर जिल्ह्यात एकच खळबळ! जन्मदात्या पित्याकडून पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, महिन्याभरात तीन वेळा नको ते कृत्य..

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वडिलांनी आपल्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी आरोपी बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई बाहेरगावी गेली असताना 28 जुलैच्या रात्री बापाने 11 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी दोनवेळा लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणाची माहिती पीडित मुलीने आईला दिली आणि त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

मुलगी रात्री झोपलेली असताना वडिलांनी तिचा गैरफायदा घेत लैंगित अत्याचार केला. पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी बापाला अटक केली आहे‌.

दरम्यान, जेव्हा पीडित मुलीची आई घरी आली. तेव्हा मुलीच्या चेहऱ्यावर यक्ष प्रश्न होेते. तिने मुलीस विचारणा केली. मात्र, निव्वळ उडवा-उडविची उत्तरे मिळाली. तरी देखील इतका मोठा प्रसंग मुलगी थोडीच पचविणार आहे.! त्यानंतर काही तास गेल्यावर हा घडलेला प्रकार उघड झाला. मुलीला विश्वासात घेतल्यानंतर

तिने तिच्या वेदना व्यक्त केल्या. त्यानंतर, त्या माऊलीच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली. त्यानंतर हा सर्व रोष बरोबर निघाला. मात्र, खरोखर पीडित व्यक्तीच्या आईचे कौतूक केले पाहिजे. त्यांनी आपल्या नराधम आवताराच्या पतील पाठीशी न घालता थेट पोलीस ठाण्यात जाईन तक्रार केली.

त्यानंतर पोलीस उपाधिक्षक राहुल मदने, पोलीस निरिक्षक मुकुंद देशमुख यांनी तत्काळ या घटनेची दखल घेतली. पतीच्या विरुद्ध पत्नीची फिर्याद आणि मुलगी पीडित. अशा प्रकारे यात गुन्हा दाखल झाला असून संगमनेर शहर पोलिसांनी आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक निकिता महाले करीत आहेत.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!