Wednesday, December 8, 2021

पुलावरून दोन पलट्या घेत मालवाहू कंटेनर उलटला; अपघातात चालक मात्र

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील बाजार तळानजीक असलेल्या धोकादायक अपघाती वळण रस्त्यावरील अरुंद पुलावरून दोन पलट्या खात मालवाहू कंटेनर थेट ओढ्यात उलटून अपघातग्रस्त झाला.

गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावर ही अपघाताची घटना घडली. अपघातांचा सिलसिला सुरु असलेल्या सदर अरुंद अपघाती पुलावर साक्षात मृत्यू घोंगावत आहे.या अपघातात चालक मधुकर कांबळे हवे किरकोळ जखमी झाले.

लोणी ते नांदूरशिंगोटे या तळेगाव दिघेमार्गे असलेल्या डांबरी रस्त्याने चालक मधुकर कांबळे हे मालवाहू कंटेनरमध्ये ( टीएस १५ युए ००४५ ) पेपर घेवून बिदर (कर्नाटक) येथून सिल्वासाच्या (गुजरात) दिशेने प्रवास करीत होते. भरधाव वेगाने जाणारा कंटेनर

तळेगाव दिघे बाजार तळानजीकच्या अरुंद पुलावरून तीन पलट्या खात उलटून ओढ्यात अपघातग्रस्त झाला. अपघातातून चालक मधुकर कांबळे हे किरकोळ मार लागत बचावले.मालवाहू कंटेनर उलटला त्याच दरम्यान समोरून पुलावरून चारचाकी

अथवा दुचाकी वाहन अथवा पादचारी येत नव्हते, अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती. या अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच छत्रपती प्रतिष्ठानहे कार्याध्यक्ष सचिनभाऊ दिघे, सुनील दिघे, बी. सी. दिघे यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

नजीकच सुनील दिघे यांचे साईश एजन्सी हे इलेक्ट्रानिक दुकान आहे. सदर दुकानाच्या गोडावूनसमोर लावलेल्या सीसीटीव्हीत अपघाताच्या घटनेचे चित्रिकरण झाले. या अपघातात मालवाहू कंटेनरचे मोठे नुकसान झाले.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!