Sunday, October 24, 2021

नगर ब्रेकींग:उपसरपंचाच्या जाचाला कंटाळून ग्रामसेवकाची आत्महत्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:उपसरपंचाच्या जाचाला कंटाळून ग्रामसेवकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील खांडगाव- वडघुल

या गट ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक झुंबर मुरलीधर गवांदे यांनी सौताडा धबधब्यावरुन उडी घेऊन 24 सप्टेंबर दिवशी आत्महत्या केली होती.या प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. ज्या ठिकाणी ग्रामसेवक झुंबर मुरलीधर गवांदे यांनी आत्महत्या केली होती.

त्या धबधब्यावर घटनास्थळी गवांदे यांची बॅग, आयकार्ड, मोटरसायकल मिळाली होती. मात्र ८ दिवसांपासून मृतदेहाचा शोध सुरू होता. ८ दिवसांनी आत्महत्या केलेल्या ग्रामसेवकाचा मृतदेह आढळून आला आहे. काल दुपारी त्यांची बॉडी सापडली होती.

या प्रकरणी बीड तालुक्यातील सौंदांडा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, खांडगाव- वडघुलचे उपसरपंच राम घोडके यांच्या त्रासला कंटाळून गवांदे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे. दोषींवर कारवाईचे करण्याची

मागणी मयताच्या पत्नीने केली आहे. या प्रकरणातील उपसरपंच राम घोडके आणि ग्रामसेवक झुंबर गवांदे यांच्या संभाषणाच्या रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे.व्हायरल झालेल्या या रेकॉर्डिंगमध्ये गावातील फॉरेस्ट हद्दीत असलेल्या १५० घरांची नियमबाह्य नोंद लावण्याकरिता उपसरपंच राम घोडके

यांच्याकडून ग्रामसेवक झुंबर गवांदे यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता. यासोबतच त्यांची इतरही काही कामे घोडके यांनी सांगितले होती. ती करण्याकरिता उपसरपंच राम घोडके हे दबाव टाकत असत.

ग्रामसेवक झुंबर गवांदे यांच्या विरोधात उपसरपंच रामा घोडके यांनी वरिष्ठांकडे तक्रार देखील करण्यात आली होती. तक्रार मागे घ्यायची असेल तर ही कामे करा असे संभाषण आहे. या घटनेमुळे संपूर्ण नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!