Saturday, October 23, 2021

शेतकऱ्यांच्या अंगावर भाजप कार्यकर्त्यांनी घातली कार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शेतकरी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्षानंतर जोरदार हाणामारी आणि जाळपोळ झाल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीमध्ये उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना काळे झेंडे

दाखवण्याच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजप कार्यकर्त्यांनी गाडी घातली. त्यामुळे संघर्ष पेटला आणि शेतकरी आक्रमक झाले.केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध करणारे शेतकरी सध्या देशाच्या विविध भागात आंदोलन करत आहेत. दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी

उत्तर प्रदेशच्या प्रत्येक जिल्ह्यात महापंचायतीचं आयोजन केलं आहे. रविवारी लखीमपूर खिरी भागात उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य पोहोचणार होते. त्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी शेतकऱ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. मात्र मौर्य तिथे येण्यापूर्वीच भाजपचे काही कार्यकर्ते तिथं पोहोचले.

भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी चढवली. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर हल्लाबोल केला. भाजप कार्यकर्त्यांच्या गाड्या शेतकऱ्यांनी पेटवून दिल्या. आक्रमक शेतकऱ्यांनी 2 गाड्यांना आग लावल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!