Friday, October 22, 2021

नगर ब्रेकींग:त्या ग्रामसेवकाच्या आत्महत्येप्रकरणी उपसरपंचासह एकावर गुन्हा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील खांडगाव-वडघुल ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक झुंबर मुरलीधर गवांदे यांनी सौताडा धबधब्यात उडी घेऊन आत्महत्या केली होती.

तब्बल आठ दिवसांनी मृतदेह मिळून आल्यानंतर पत्नी मनिषा गवांदे यांच्या फिर्यादीवरून खांडगाव-वडघुलचे उपसरपंच राम घोडके व आनंदा शिंदे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

सौताडा धबधब्याजवळ गवांदे यांची बॅग, आयकार्ड, दुचाकी आढळून आली होती. मात्र मृतदेह सापडला नव्हता. आठ दिवसापासून मृतदेहाचा शोध सुरू होता. अखेर आठ दिवसानंतर मृतदेह सापडल्यानंतर शनिवार दि. 2 रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्रीगोंदा तालुक्यातील खांडगाव-वडघुल ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक झुंबर मुरलीधर गवांदे यांनी सौताडा (जि. बीड) येथील धबधब्यात उडी मारुन आत्महत्या केली होती. धबधब्याच्या शेजारी गवांदे यांचे आयकार्ड, बॅग व मोटारसायकल आढळून आली होती. मात्र मृतदेह आढळून आला नव्हता.

अखेर आठदिवसानंतर गवांदे यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर त्यांच्या पत्नी मनिषा गवांदे यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.या फिर्यादीत खांडगाव – वडघुलचे उपसरपंच राम घोडके यांच्या त्रासाला कंटाळून पती गवांदे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप ग्रामसेवक यांची पत्नी मनीषा गवांदे यांनी केला आहे.

याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.तक्रारीत म्हटले आहे की, गेल्या वीस दिवसांपासून उपसरपंच राम घोडके व ग्रामपंचायत सदस्या सुनंदा शिंदे यांचा मुलगा आनंदा शिंदे हे दोघे मिळून वन खात्याच्या जमीनीवर अतिक्रमण केलेल्या 150 घरांची नोंद लावण्यासाठी

जबरदस्तीने ग्रामसेवक झुंबर गवांदे यांच्यावर दबाव आणत होते. आमच्या पद्धतीने कामकाज करा अन्यथा तुमची नोकरी घालवून निलंबित करून पेन्शन सुविधा बंद करण्याची धमकी दिली होती.या सर्व त्रासाला कंटाळून ग्रामसेवक गवांदे यांनी आत्महत्या केली आहे.

पत्नी मनीषा गवांदे यांनी ग्रामसेवक पतीच्या गावातील उपसरपंच राम घोडके व ग्रामपंचायत सदस्य यांचे चिरंजीव आनंदा शिंदे करणीभूत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!