Saturday, October 23, 2021

अजित पवार म्हणतात म्हणून नगर जिल्ह्यातील त्या 61 गावात निर्बंधांचा निर्णय

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारपासून सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज (साेमवार) उपमुख्यमंत्र्यांनी येथील शासकीय विश्रामगृहात सातारा जिल्ह्याची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर आणि संगमनेर तालुक्यात काेविड १९ रुग्ण संख्या वाढल्याने नगर जिल्ह्यातील ६१ गावांवर निर्बंध लावले आहेत. पुणे आणि नाशिक जिल्ह्याला फटका बसू नये यासाठी आत्ताच नगर जिल्ह्यातील दाेन तालुक्यातील रुग्ण संख्या राेखण्यासाठी निर्णय घेतला गेल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

आजपासून राज्यात शाळा सुरू होत आहेत. परंतु अद्याप १८ वर्षाखालील मुलांचे लसीकरण झालेले नाही याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले १२ ते १८ वर्षाच्या मुलांचे लसीकरण करावे अशी चर्चा आहे. अद्याप केंद्राकडून कोणताही निर्णय झालेला नाही.

केंद्राचा निर्णय झाल्यावर लसीकरण सुरू केले जाईल. परंतु मुलांना शाळेत पाठवायचे की नाही हा सर्वस्वी निर्णय पालकांचा असून अद्याप मुलांना शाळेत पाठवण्याची पालकांची मानसिकता दिसत नाही असेही पवार यांनी नमूद केले.

ऊसाच्या एफआरीपी FRP बाबत राजू शेट्टी यांनी दिलेल्या इशाऱ्यावर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले गत वर्षीची रिकव्हरी पाहून हा निर्णय घेतला जातो.राजू शेट्टी त्यांच्या पद्धतीने त्यांची भूमिका मांडत आहेत, त्या संदर्भात चर्चा करून पुढचा निर्णय घेतला जाईल.

नगर जिल्ह्यातील ६१ गावांत लॉकडाउन करण्यात आला आहे. या विषयी उपमुख्यमंत्री पवार यांनी पारनेर आणि संगमनेर तालुक्यात काेविड १९ रुग्ण संख्या वाढल्याने निर्णय घेतला गेल्याचे सांगितले. पुणे आणि नाशिक जिल्हा या दोन तालुक्यांना लागून आहे.

त्यामुळे ही रुग्णसंख्या रोखली पाहिजे अन्यथा याचा फटका पुणे आणि नाशिकला बसू शकतो असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमूद केले.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!