Wednesday, October 27, 2021

खासदार सुजय विखेंचा अजित पवारांवर गंभीर आरोप

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:करोना संसर्ग वाढल्याने अहमदनगर जिल्ह्यातील ६१ गावांत आजपासूनकडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र, ‘हा निर्णय अन्यायकारक असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार पुणे व नाशिकला वाचविण्यासाठी नगर जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे

असा गंभीर आरोप भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला आहे. ‘नगर जिल्ह्यात सर्वाधिक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, त्यामुळे त्यांनी याविरुद्ध भूमिका घ्यावी, अन्यथा आम्ही भाजपतर्फे आंदोलन सुरू करू,’ असा इशाराही खासदार सूजय विखे पाटील यांनी दिला.

अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्यात आलेल्या गावांमध्ये विखे पाटील यांच्या लोणी गावाचाही यामध्ये समावेश आहे. त्यांच्या मतदारसंघातील अनेक गावेही बंद ठेवण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लॉकडाऊनसंबंधी लावलेले निकष चुकीचे असून ते बदलण्यात यावेत, अशी मागणी विखे यांनी

जिल्हाधिकाऱ्यांना भेटून केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्यावर आरोप केला. ते म्हणाले, ‘नगरमध्ये लॉकडाऊन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याचे आपल्या वाचनात आले. पुणे व नाशिकमध्ये रुग्ण वाढत असल्याने त्यांनी नगरला लॉकडाऊन करणे

भाग पाडल्याचे यावरून दिसून येते. वास्तविक नगर जिल्ह्यात सर्वाधिक आमदार राष्ट्रवादीचे आहेत. तरीही चुकीचे निकष लावून येथील गावे बंद करण्यात आली. हे करतानाही सत्ताधारी पक्षांच्या तुलनेत भाजपच्या मतदारसंघावर आणखी अन्याय करण्यात आला आहे. मुळात दहा रुग्ण आढळले म्हणून गाव बंद

करण्याचा निकष चुकीचा आहे. गावांची लोकसंख्या कमी जास्त असते. त्यामुळे त्या लोकसंख्येच्या टक्केवारीचा निकष लावला जाण्याची गरज आहे.’करोनाची तिसरी लाट नगर जिल्ह्यातून येणार असे सांगत जर कोणी नगरला बदनाम करीत असेल तर ते सहन केले जाणार नाही.

नगर जिल्ह्यात सर्वाधिक चाचण्या होत आहेत. त्यामुळे येथे जास्त रुग्ण आढळून येत आहेत असे विखे म्हणाले.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!