Monday, October 25, 2021

साईबाबांच्या दर्शनासाठी यांना प्रवेश नाही तर हार, प्रसाद घेऊन जाता येणार नाही कारण…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज – अहमदनगर जिल्ह्यातील कोवीड परिस्थिती लक्षात घेता धार्मिक स्थळांवर व प्रार्थनास्थळांवर कोरोना नियमावलीचे कोटकोरपणे अंमलबजावणी होईल, याची दक्षता मंदिर प्रशासन व शासकीय विभागाने घ्यावी. तसेच शिर्डी श्री.साईबाबा मंदिरात ऑनलाईन पास असलेल्या भक्तांनाच प्रवेश दिला जाईल.

दररोज 15 हजार भक्तांना प्रवेश दिला जाईल. प्रसादालय बंद ठेवण्यात येईल. अशी माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भोसले यांनी आज येथे दिली.

दि.७ ऑक्टोंबर पासून धार्मिकस्थळे भक्तांसाठी सुरू करावयाच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजना संदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक श्री.साईबाबा संस्थानच्या सभागृहात आज संपन्न झाली. डॉ.राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. त्यावेळी श्री.भोसले बोलत होते.

श्री.भोसले म्हणाले, शासनाच्या 11 ऑगस्ट 2021 च्या मार्गदर्शक सूचनांची जिल्ह्यातील धार्मिक स्थळे सुरू करतांना काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्रत्येकाने 6 फुटांचे अंतर पाळणे, मुखपट्टीचा वापर करणे बंधनकारक व सॅनिटायझरने वारंवार हात धुणे, या कोरोना नियमावलींचे मंदिर व परिसरात सक्तीने

अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच मंदिर प्रवेशापूर्वी प्रत्येक भक्तांचे थॅर्मल स्कॅनरद्वारे शरिराचे तापमान तपासले जाईल. कोवीड-19 ची कोणतीही लक्षणे आढळून आल्यास भक्तांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. यामध्ये 10 वर्षाखालील बालकांना, गरोदर स्त्रिया, 65 वर्षावरील व आजारी व्यक्तीत तसेच मास्क न

वापरणा-या भक्तांना जिल्ह्यातील मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच मंदिर परिसरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने रात्री साडेआठ वाजेनंतर बंद करण्यात याव्यात.मंदिरात प्रवेश देतांना कोवीड लसीकरण प्रमाणपत्र देण्याची सक्ती केली जाणार नाही. दर्शनासाठी येतांना पुजेचे साहित्य आणू नये.

पुजेच्या साहित्यासह आत प्रवेश दिला जाणार नाही. मात्र जास्तीत जास्त भाविकांनी कोरोना लसीकरण करूनच मंदिर प्रवेश करावा. असे आवाहन श्री.भोसले यांनी यावेळी केले.बैठकीत शिर्डी , शनिशिंगणापूर, मोहटे व राशिन देवस्थान च्या मुख्य कार्यकारी अधिकारी व पदाधिकारी यांच्यांशी मंदिर नियमावली बाबत चर्चा केली.

मंदिर प्रशासनाचे जिल्हा प्रशासनाला दिलेल्या हमीपत्रांवरील बाबींवर चर्चा झाली. त्यानंतर अहमदनगर जिल्हयातील कोवीड परिस्थिती लक्षात घेता. कोवीड मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे सर्वानुमते ठरल्यानंतर सर्व विभागांना

याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!