Monday, October 18, 2021

साईमंदीर उघडणार पण लाडू प्रसाद, तीर्थप्रसाद बंद

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शिर्डीतील साई मंदिरात साई संस्थान प्रशासनाने घेतलेल्या निर्णयात बदल करत दिवसभरात दर्शन दिले जाणार्‍या पंधरा हजार भाविकांना ऑनलाईन पद्धतीनेच बुकिंग करून दर्शनाचा लाभ घेता येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले आहे.

साईबाबा संस्थानच्यावतीने दि.5 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन 7 ऑक्टोबर रोजी साईमंदिर खुले करण्यासंबंधीची नियमावली मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईत यांनी जाहीर केली होती. यावेळी श्रीमती बानाईत

यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते की साई मंदिर राज्य शासनाच्या आदेशानुसार सुरू करण्यात येणार असून दररोज पंधरा हजार भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे, यामध्ये पाच हजार सशुल्क पासेस, पाच हजार ऑनलाईन व पाच हजार

बायोमेट्रिक पद्धतीने असे नियोजन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर दोनच तासांनी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी शिर्डी, शनिशिंगणापूर, मोहटादेवी मंदिर सुरू करण्याबाबत आढावा बैठक साई मंदिरातील साई सभागृहात आयोजित केली.

त्याचबरोबर साई प्रसादालय बंद ठेवण्यात आल्याने भाविकांची मोठी गैरसोय होणार आहे. दर गुरुवारी निघणारी बाबांची पालखी देखील सध्या बंद ठेवण्यात आली आहे. मंदिर नियमित वेळेनुसार पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार आहे.

लाडू प्रसाद, तीर्थप्रसाद बंद राहणार असून दर्शन रांगेत भाविकांना देण्यात येणारा चहा-बिस्किटे तूर्तास बंद करण्यात आले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!