Monday, October 25, 2021

डास चावला तरी रहा बिंधास्त कारण आता….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी RTS, S/AS01 मलेरिया लसीला मान्यता दिली आहे. डासांमुळे होणाऱ्या आजाराविरूद्धची ही पहिली लस असणार आहे.मच्छर चावल्याने होणारा आजार होतो. अशा जीवघेण्या मलेरियावर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवता येणे आता शक्य होणार आहे.

कारण जागतिक आरोग्य संघटनेनं अर्थात WHOने या आजारावर जगातील पहिल्या लसीला बुधवारी मान्यता दिली. RTS,S/AS01 नामक ही लस लहान मुलांसाठी असणार आहे. WHOचे प्रमुख टेड्रोस घेब्रेसेस यांनी ही घोषणा केली. या मलेरिया लसीमुळे अप्रगत आणि गरीब देशांना मोठा आधार मिळणार आहे.

मलेरिया लसीच्या सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये चांगले आणि सुरक्षित परिणाम दिसून आले आहेत. आता या लसीला मान्यताही मिळाली आहे. त्यामुळे मलेरियापासूनचा भविष्यातील धोका टळण्यात मदत होणार आहे. तसेच मलेरियामुळे बालकांच्या मृत्यूदरातही घट होणार आहे.

RTS,S/AS01 या नावाने ही लस ओळखली जाणार आहे. GSK फार्मा कंपनीने ही लस विकसित केली आहे. चार डोसमध्ये ही लस देण्यात येणार आहे. कमी संसाधनांमध्ये चार-डोस वितरित करण्याच्या जटिलतेमुळे लस प्रत्यक्षात किती उपयुक्त ठरू शकते याबद्दल चिंता वाढली होती. या कारणास्तव,

WHOच्या लस सल्लागारांनी यापूर्वी लस वापरण्याची शिफारस प्रायोगिक तत्वावर केली होती. हा कार्यक्रम 2019 मध्ये सुरू झाला, घाना, केनिया आणि मलावीने या लसीचा वापर सुरु केला आहे.सहारन अफ्रिकेत मलेरियाचा मृत्यूदर सर्वाधिक आहे. या आजारामुळे तरुण मुलांचा सर्वाधिक बळी गेला आहे.

आफ्रिकेतील घाना, केनिया आणि मलावीमध्ये 2019 पासून पायलट प्रोग्रामच्या माध्यमातून लहान मुलांना मलेरिया लसीचे डोस देण्यात आले. ज्यामध्ये लसीचे दोन दशलक्षाहून अधिक डोस देण्यात आले होते. याचा चांगला प्रभाव लक्षात घेतल्यानंतर मलेरियाच्या लसीला मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!