Saturday, October 23, 2021

नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिर दर्शनासाठी खुले

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

ज्ञानोबा..माऊली…..तुकाराम.”पुंडलिक वरदा… हरि विठ्ठल”चा जयघोष करत नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.मंदिराचे प्रमुख हभप गुरुवर्य शिवाजी महाराज यांच्या हस्ते मंदिराचे कुलूप उघडण्यात आले.भक्तीची शक्ती श्रद्धेचे बळ कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी फलदायी ठरेल असे प्रतिपादन शिवाजी महाराज देशमुख यांनी यावेळी बोलतांना केले.

गेल्या दीड ते दोन वर्षांपासून शासन आदेशानुसार सर्व मंदिरे बंद होती आता ती उघडली असली तरी सुरक्षेसाठी सामाजिक अंतराचे पालन येथे केले जात असून दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली असून मंदिर खुले झाले असले तरी माऊलींच्या “पैस” खांबापासून पंधरा ते वीस फूट अंतरावर पादुका ठेवण्यात येऊन दर्शनाकरीता सामाजिक अंतराचे पालन करण्याचा निर्णय संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थानच्या वतीने घेण्यात आला असल्याचे शिवाजी महाराज देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी दर्शन घेण्यासाठी कीर्तनकार ह.भ.प.मारुती महाराज नांदेडा,संत ज्ञानेश्वर माऊली मंदिराचे प्रसिद्धी प्रमुख पत्रकार सुधीर चव्हाण,मंदिराचे सेवेकरी शिवाजी आप्पा होन,व्यवस्थापक भगवान सोनवणे,भैय्या कावरे, संदीप आढाव,गोरख भराट, सौ.रेखाताई जाधव, आदेश टेकाळे,शिवा राजगिरे,जालिंदर गवळी, ज्ञानेश्वर पवार यावेळी उपस्थित होते.
मंदिर खुले झाल्यामुळे मंदिर परिसरात व दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये उत्साह दिसून येत होता मंदिरे उघडण्याचा शासन निर्णय झाल्यामुळे स्वच्छता अभियान द्वारे परिसर स्वच्छ करण्यात आला होता.तर पहाटेच्या सुमारास माऊलींचे मूर्तीमंत रूप असलेल्या पैस खांबाचे पूजन मंदिराचे प्रमुख हभप शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले होते.मंदिरे दर्शनासाठी खुले करण्यात आल्याने आम्हाला आनंद झाला असून भक्ती ची शक्ती कोरोनाला लवकरच हद्दपार करेल अशी प्रतिक्रिया हरिभक्त परायण मारुती महाराज काळे यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली.

 

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!