Wednesday, October 27, 2021

नाराज असलेले खासदार विखे व आमदार मोनिका राजळे दिसले एकाच व्यासपीठावर पण दोघांनी ….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीत काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी व डॉ. विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा अपंग (दिव्यांग) पुनर्वसन केंद्र व जिल्हा समाज कल्याण विभागातर्फे राष्ट्रीय वयोश्री

योजने अंतर्गत मोफत सहायक साधने वाटप शिबिर झाले. या निमित्त अनेक दिवसांच्या कालखंडानंतर एकमेकांवर नाराज असलेले खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार मोनिका राजळे एकत्र दिसले. त्यामुळे हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर दिसल्याने भाजप वर्तुळात तो चर्चेचा विषय ठरला.

खासदार विखे व आमदार राजळे गटात राजकीय मनोमिलन झाले की पक्षीय कार्यक्रमानिमित्त हे दोघे एकत्र आले, हे मात्र समजू शकले नाही. मध्यंतरी झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे व राजळे गटात दुरावा निर्माण झाला होता. या निवडणुकीत राजळे यांना विश्वासात न घेता विखे यांनी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड

यांना उमेदवारी दिली होती. आपल्याला विश्वासात न घेता ही उमेदवारी विखे यांनी जाहीर केल्याने या दोघांत दुरावा निर्माण झाला होता.निवडणुकीत आव्हाड यांनी माघार घेतली असली, तरीही त्यानंतर विखे व राजळे यांनी एकही एकत्रित कार्यक्रम घेतला नव्हता. विखे हे त्यानंतर अनेकदा तालुक्यात आले. मात्र राजळे त्यांच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या

 नव्हत्या, तर राजळे यांनीही अनेक कार्यक्रम घेतले. त्यासाठी त्यांनी विखे यांना बोलावले नव्हते.विखे यांच्या पुढाकारातून स्वतंत्र भारताचा अमृत महोत्सव व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात दोन दिवसीय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराच्या निमित्ताने विखे व राजळे आज एकत्र आले. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी मोठा हार घालून त्यांचे स्वागत केले. दोघांनीही भाषणबाजी टाळत रुग्ण व आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत निघून जाने पसंद केले.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!