Wednesday, October 27, 2021

नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी पाळायचे दहा नियम

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:दरवर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होते. यानंतर पुढील 9 दिवसांसाठी दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. या नऊ दिवसांमध्ये देवी पृथ्वीवर अवतरते आणि भक्तांचे दुःख दूर करते अशी मान्यता आहे.

तसेच या काळात भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे देखील मानले जाते.नवरात्रोत्सवात उपवास करणाऱ्यांनी दहा नियमांचे काटेकोरपण पालन करणे आवश्यक आहे. या नियमांचे पालन करुन उपवास प्रामाणिकपणे करणाऱ्यांना व्रताचे फळ मिळते, असे म्हणतात. चला तर मग जाणून घेऊ नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी पाळायचे दहा नियम….

नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी नवरात्रोत्सवाच्या काळात ब्रह्मचर्य पाळावे. नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी खोटे बोलू नये. रागावणे, वाद घालणे टाळावे. नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी लहान मुले-मुली, महिला, ज्येष्ठ नागरिक यांचा आदर करावा. त्यांची काळजी घ्यावी.

नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी पान, तंबाखू, गुटखा, मावा, सिगरेट (धूम्रपान), विडी (धूम्रपान), दारू (मद्यपान), अंमली पदार्थ यांचे व्यसन करू नये. मांसाहार करू नये. मसालेदार पदार्थ खाऊ नये. नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी त्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची जाणीव ठेवून कोणत्या प्रकारचा उपवास

करायचा याचा निर्णय घ्यावा आणि उपवासाच्या व्रताचे पालन प्रामाणिकपणे करावे. रसोपवार, फलोपवास, दुग्धोपवास, लघु उपवास, अधोपवास, पूर्णोपवास असे उपवासाचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपल्या क्षमतेचा विचार करुन यापैकी योग्य त्या पर्यायाची निवड करावी. नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी कामाशिवाय प्रवास करणे टाळावे.

नवरात्रोत्सवाच्या काळात सहल करणे, मौजमजा करणे टाळावे. व्रत प्रामाणिकपणे करावे. आजारी असल्यास उपवास करणे टाळावे. ज्या मुलीची अथवा महिलेची मासिक पाळी सुरू आहे तिने उपवास करणे टाळावे. गरोदर महिलेने वैद्यकीय सल्ला घेऊन उपवासाबाबतचा निर्णय घ्यावा. युद्ध काळात उपवास टाळावा.

नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी प्रामाणिकपणे व्रताचे पालन करावे. व्रत मध्येच तोडू नये. विशेष परिस्थितीमुळे व्रतभंग करणे आवश्यक असल्यास देवीची माफी मागून व्रतभंग करावा. अधोपवास म्हणजे एक वेळचे जेवून उपवास करणाऱ्यांनी नवमीच्या दिवशी दुधीचे कोणत्याही प्रकारे सेवन करू नये. प्रामाणिकपणे व्रताचे पालन करावे.

सप्तमी, अष्टमी आणि नवमी या तीन दिवशी उपवास करणाऱ्यांनी विधीवत व्रताची सांगता करावी. नऊ कुमारिकांना जेवण देऊन तसेच दक्षिण देऊन व्रत पूर्ण करावे

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!