Monday, October 18, 2021

का साजरा केला जातो नवरात्री उत्सव? जाणून घ्या काय आहे महत्त्व

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:हिंदू दिनदर्शिकेनुसार शारदीय नवरात्र उत्सव दरवर्षी शरद ऋतूमध्ये अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होते. नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. या वर्षी शारदीय नवरात्री 7 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. नवरात्रीमध्ये नऊ दिवस, भक्त दुर्गा देवीच्या (Durga Devi) विविध रूपांची पूजा

करतात आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी व्रत देखील केले जाते. असे मानले जाते की दुर्गा देवीची नऊ दिवस भक्तिभावाने पूजा केल्याने ती आनंदी होते आणि भक्तांचे सर्व त्रास दूर करते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मंदिराची साफसफाई केल्यानंतर तिथे कलशची (घटाची) स्थापना केली जाते.

नवरात्रीचे महत्त्व :हिंदू धर्मात वर्षातून चार वेळा नवरात्री येते. परंतु चैत्र आणि शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र नवरात्रीपासून मानली जाते. त्याचबरोबर शारदीय नवरात्रीचेही वेगळे महत्त्व आहे. असे म्हटले जाते की शारदीय नवरात्री धर्मावर अनीतीवर आणि असत्यावर

 सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे. धार्मिक मान्यतेनुसार या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवी पृथ्वीवर येते आणि पृथ्वीला तिचे माहेर म्हटले जाते. देवीच्या आगमनाच्या आनंदात हे नऊ दिवस देशभरात दुर्गा उत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी

भक्त कलश स्थापन (घटस्थापना) करतात आणि या नऊ दिवसांमध्ये उपवास देखील केला जातो.

नवरात्रीची आख्यायिका :नवरात्रोत्सव साजरा करण्याच्या दोन पौराणिक कथा आहेत. पहिल्या कथेनुसार महिषासुर नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि वरदान मागितले की विश्वातील कोणताही देव, राक्षस किंवा पृथ्वीवरील मनुष्य त्याला मारू शकत नाही.

हे वरदान मिळाल्यानंतर महिषासुराने दहशत निर्माण करायला सुरुवात केली. त्याची दहशत थांबवण्यासाठी दुर्गा देवी शक्तीच्या रूपात जन्माला आली. दुर्गा देवी आणि महिषासुर यांच्यातील युद्ध नऊ दिवस चालले आणि दहाव्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला.

दुसऱ्या एखा कथेनुसार जेव्हा भगवान श्री राम लंकेवर हल्ला करणार होते त्यापूर्वी त्यांनी माता भगवतीची पूजा केली. रामाने रामेश्वरमध्ये नऊ दिवस देवीची पूजा केली आणि त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवीने श्री रामाला विजयाचे आशीर्वाद दिले. त्यानंतर दहाव्या दिवशी

रामाने रावणाचा पराभव करून लंका जिंकली. या दहाव्या दिवशी विजयादशमीचा सण म्हणजेच दसरा साजरा केला जातो.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!