Monday, October 25, 2021

खा सदाशिव लोखंडे पडले नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या दिग्गज नेत्यांच्या पाया अन् पुढे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर येथे आज खासदार लोखंडे हे भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री मधुकर पिचड यांना भेटण्यासाठी आले होते. केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे सुद्धा राजूर येथे पिचड यांच्या निवासस्थानी येणार असल्याने त्यांच्याकडे सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी होती.

मंत्री येण्यापूर्वीच लोखंडे आल्याचे समजताच माजी मंत्री मधुकर पिचड यांनी लोखंडे यांचे स्वागत केले. या प्रसंगी खासदार लोखंडे यांनी पिचड यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. यावेळी खासदार यांच्या सोबत त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

निळवंडे धरणाच्या चारीचा पाणी प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी मोठा निधी नुकताच मंजूर झाला. त्यानुसार कामेही सुरू झाली आहेत. त्यामुळे हा पाणी प्रश्न सुटण्याची चिन्हे आहेत. हा प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी केंद्र व राज्य सरकारांकडे पाठपुरावा केला होता.

या प्रसंगी खासदार लोखंडे म्हणाले, शिर्डी लोकसभा खासदार म्हणून काम करताना निळवंडेसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी सर्वांचेच मोलाचे मार्गदर्शन झाले. माजी मंत्री मधुकर पिचड यांचेही निळवंडे पुनर्वसनासाठी मोठे योगदान असल्याची कबुली खासदार सदाशिव लोखंडे यांनी राजूर येथे बोलताना दिली.

साहेब तब्येतीची काळजी घ्या यापुढेही मार्गदर्शन करा, असेही लोखंडे म्हणाले.यावर माजी मंत्री मधुकर पिचड यांनी मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणाचा धागा पकडून खासदार म्हणून तुमचे काम चांगले आहे. आमच्या तालुक्यातील धरणात व प्रकल्पात

 विस्थापित झालेल्या आदिवासी जमिनीवर 7/12 वर महाराष्ट्र शासन नाव लावून शेतकऱ्याला इतर हक्कात टाकणार असून आपण आमचा आवाज संसदेत पोहचवा, अशी मागणी पिचड यांनी लोखंडे यांच्याकडे केली.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!