Friday, October 22, 2021

मोठी बातमी:शरद पवारांकडून शिवसेना-राष्ट्रवादी युतीचे संकेत

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे निर्माते खासदार शरद पवार हे २ दिवसीय सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापुरात येताच त्यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या कामावर संधान व्यक्त केले.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या नेतृत्त्वातील आघाडीचे सरकार उत्तमरीत्या काम करत आहेत. मात्र राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून आघाडी सरकारला त्रास देण्याचे काम सुरू आहे. अशा चुकीच्या लोकांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता जाऊ नये, हीच राष्ट्रवादीची भूमिका आहे. आपल्याला मुख्यमंत्र्यांचा सन्मान वाढवायचा आहे.

आपल्या पक्षाकडून त्यांना योग्य सन्मान मिळेल असेच काम करायचे आहे, असे म्हणत शरद पवार यांनी शिवसेना-राष्ट्रवादी युतीचे संकेत दिले. ते आज राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलत होते.निवडणुकांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर यश आलं. पण सरकार बदलण्याची स्थिती नव्हती. रोज आम्ही पाहत होतो.

आज होईल उद्या होईल.असं वाटत होतं. आम्ही थंड डोक्याने बसलो होतो. कारण हे लोक जाऊन कुठे जाणर हे आम्हाला माहीत होतं, असंही त्यांनी सांगितलं. हे सरकार आपल्याला टिकवायचे आहे. मुख्यमंत्र्यांचा सन्मान वाढवायचा आहे. हे राज्य चुकीच्या हाती द्यायचं नाही. त्यांचा अनुभव चांगला नाही. म्हणून आम्ही एकत्र आलो, असेही पवारांनी स्पष्ट केले.

तसेच, आणखी एक गोष्ट सोलापूरच्या निमित्ताने आठवली. विधानसभेच्या निवडणुकीआधी सोलापूर जिल्ह्यात अनेक नेत्यांची पळापळ सुरू होती.अनेक वर्ष पक्षात महत्त्वाची पदं भूषवलेले अनेक नेते पक्ष सोडून पळून गेले. त्यामुळे तरुण कार्यकर्त्यांमध्ये एक अस्वस्थता होती.

त्यावेळी या पळपुट्या नेत्यांविरोधात संघर्ष करण्याची गरज होती. तो निर्णय आम्ही घेतला व त्या संघर्षाची सुरुवात याच हुतात्मा स्मृती मंदिर सभागृहातून केली. माझे पहिले भाषण येथेच झाले होते. त्यावेळी चर्चा होती की, भाजपचेच सरकार येणार.

पण, आज राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार काम करत आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपण आत्मविश्वासाने लढल्याची आठवण पवार यांनी सोलापुरात करून दिली.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला पळवून नेले

    माय महाराष्ट्र न्यूज:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. 19 ऑक्टोबर रोजी घडली.अहमदनगर जिल्ह्यातील...

जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना नगरचे पालकमंत्री जनतेला लुटत होते

माय महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका...

विखे-पाटील यांना नैराश्याने ग्रासले

माय महाराष्ट्र न्यूज : भाजपचे तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धती देशाच्या, जनतेच्या हिताची नाही. त्यामुळे राज्यात किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार येत्या महापालिका...

बापरे:कोरोनाचा नव्या रुपातील विषाणू आढळून आला

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे शंभर कोटीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त डॉ. मांडे यांच्याशी सीएसआयआर मुख्यालयात सकाळने संवाद साधला. कोरोनाचा नव्या रुपातील...

नगरमध्ये दोन भावांकडून महिलेची छेडछाड लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत…

माय महाराष्ट्र न्यूज:दोन भावांनी एका विधवा महिलेची छेडछाड करीत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून विकास शामसुंदर गायकवाड...

फडणवीसांची जिरवायची हे गडकरींसोबत आधीच ठरलं होत: काँग्रेस नेत्यांचा खळबळजनक दावा

माय महाराष्ट्र न्यूज:नांदेड इथल्या बिलोली येथे आयोजित प्रचारसभेत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाला बहुमत जरी...
error: Content is protected !!