Friday, October 22, 2021

ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी आयएमपीएस सेवेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. आता ग्राहक एका दिवसात ५ लाख रुपयांपर्यतचे ट्रान्झॅक्शन करू शकतील. याआधी ही मर्यादा २ लाख रुपये इतकी होती.

भारतात ऑनलाइन बॅंकिंगच्या माध्यमातून कधीही, कुठेही पैसे पाठवता येतात. मात्र पैसे पाठवण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत. ऑनलाइन बॅंकिंगद्वारे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तीन प्रकार असतात. हे तीन प्रकार म्हणजे आयएमपीएस , एनईएफटी , आरटीजीएस , या तीन सेवांचा वापर करून पैसे ट्रान्सफर करता येतात.

आयएमपीएस म्हणजे इमीडियेट मोबाइल पेमेंट सर्व्हिस. आयएमपीएसद्वारे कोणत्याही खातेधारकाला कुठेही तात्काळ पैसे पाठवता येतात. यामध्ये पैसे पाठवण्यासाठी वेळेचे कोणतेही बंधन नाही. आठवड्याचे सातही दिवस २४ तास कधीही तुम्ही आयएमपीएस सेवेद्वारे काही सेकंदातच पैसे ट्रान्सफर करू शकता.

आरबीआयने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार आता ग्राहक आयएमपीएसद्वारे ५ लाख रुपयांपर्यतचे ट्रान्झॅक्शन करू शकतात. याआधी ही मर्यादा २ लाख रुपये होती. आयएमपीएसद्वारे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी अनेक बॅंका कोणतेही शुल्क आकारत नाहीत.

मोबाइल बॅंकिंगद्वारे करा व्यवहार

आरटीजीएस, एनईएफटी किंवा आयएमपीएससारख्या सुविधांसाठी इंटरनेट सेवा आवश्यक आहे. तुमच्याकडे कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा स्मार्टफोन असल्यास या सुविधांचा लाभ घेता येतो. जर तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल तर तुम्ही मोबाइल बॅंकिंगची

सुविधा वापरू शकता. ज्या बॅंकेत तुमचे खाते आहे त्या बॅंकेचे अॅप तुम्ही डाउनलोड करा. त्यानंतर तुम्ही एम-पिन किंवा पिन जनरेट करून त्या अॅपद्वारे तुमचे बॅंकिंग व्यवहार करू शकतात. या अॅपमध्ये फंड ट्रान्सफरचा पर्याय असतो त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता.

ताज्या बातम्या

प्रेरणा पतसंस्थेचे संचालक आप्पासाहेब चंद्रे यांचे अपघाती निधन

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गुहा येथील प्रेरणा पतसंस्थेचे संचालक आप्पासाहेब बाप्पू चंद्रे वय 42 यांचे गुहा ते राहुरी प्रवास करीत असताना राजश्री...

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...
error: Content is protected !!