Wednesday, October 27, 2021

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आनंदाची बातमी :यंदा कापसाच्या दराच तेजी राहणार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:यंदा अतिरीक्त पावसामुळे खरीपातील उत्पादनाची गणितेच बिघडलेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. पण उत्पादन घटल्याने दरही वाढणार आहेत. सोयाबीनच्या बाबतीत हे होत नसले तरी कापसाचे मात्र, दर वाढत आहेत.

राज्यात 85 लाख गाठी कापसाच्या उत्पादनाचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पावसानंतर बदलल्या परिस्थितीमुळे हे लक्ष्य कमी करुन 75 लाखावर आलेले आहे.वाढणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी कापसाची तोडणी केली आहे.

त्यांनी साठवणूकीवर भर दिला तर अधिकचा फायदा होणार आहे. सुरुवातीला राज्यभरात 85 लाख गाठीचे उत्पादन होईल, असा अंदाज होता. गतवर्षी कॉटन फेडरेशनने राज्यात 7.44 लाख गाठ कापसाची खरेदी केली होती. यावर्षीही जवळपास याप्रमाणातच खरेदी केली जाणार आहे. जर शेतकरी केंद्रांवर कापूस घेऊन आले

तर अधिकाधिक खरेदी करण्यात येईल. याप्रमाणेच सीसीआयने गतवर्षी 7.50 लाख बेल्स कापसाची खरेदी विदर्भात आणि 10 लाख बेल्सची खरेदी मराठवाड्यात केली होती. त्यावेळी कोरोनाचा प्रादूर्भाव सुरू असल्याने शेतकरी दोन्ही एजन्सीकडे मोठ्या संख्येत पोहोचले होते.कापसाचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणात घटलेले आहे.

त्यामुळे बाजारपेठेत याचा परिणाम झाला असून कापसाचे दर हे वाढलेले आहेत. सध्या कापसाला 7000 रुपये क्विंटलचा दर मिळत आहे. दुसरीकडे खरेदी केंद्रावर मात्र, 6025 दर ठरवून देण्यात आला आहे. त्यामुळे साहजिकच शेतकरी हे हमीभाव केंद्राकडे पाठ फिरवणार आहेत.

मात्र, नोव्हेंबर नंतरच कापसाची आवक होणार असून शेतकऱ्यांनी योग्यरित्या साठवणूक करून ठेवली तर अधिकचा फायदा होणार आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!