Monday, October 25, 2021

मोठी बातमी :यामुळे उद्या महाराष्ट्र बंद ;मात्र यांना वगळण्यात आले

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: उद्या सोमवार 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीने दिली आहे. याची माहिती आघाडीच्या नेत्यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेऊन दिली. या पत्रकार परिषदेला शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित होते.

उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर देशातील शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी भाजपवर केला.

पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, या बंदात महाविकास आघाडीतील तिन्हीही पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहेत. अन्नदात्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून हत्या करण्यात आली. या मुद्द्यावर देशातील जनतेला जागे करण्यासाठी महाराष्ट्रात बंद पुकारण्यात येणार आहे.

तसंच या बंदमध्ये सर्व पक्षांनी सहभागी व्हावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे, असंही ते म्हणाले. तसंच हा बंद 100 टक्के यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नवाब मलिक म्हणाले भाजप शेतकऱ्यांचे हित पाहणारा पक्ष नसून तो शेतमालाची लूट करणारा पक्ष आहे. आता तर भाजप शेतकऱ्यांची हत्या करणारा पक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी घणाघाती टीकाही नवाब मलिक यांनी केली.

 सचिन सावंत म्हणाले. ज्या पद्धतीने प्रियांका गांधी, राहुल गांधींना अडवण्यात आले ते पाहता देशात हुकुमशाही आली आहे, असे म्हणावे लागेल. त्याचबरोबर यंत्रणांचा गैरवापर करुन विरोधकांवर दमनशाही केली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!