Friday, October 22, 2021

Dream 11 अ‍ॅप गोत्यात, गुन्हा दाखल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आयपीएलचा १४ हंगाम सध्या दुबईमध्ये सुरू असून, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सध्या फक्त आणि फक्त आयपीएलची चर्चा सुरू आहे. आयपीएलसोबत आणखी एक गोष्ट चर्चेत आहे, ती म्हणजे ‘ड्रीम 11’ हे अॅप्लिकेशन. मात्र आता ड्रीम 11 वापरणाऱ्यांसाठी एक चिंतेची बाब समोर आली आहे.

ऑनलाइन गेमिंगवर बंदी घालणाऱ्या नवीन स्थानिक कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल कर्नाटकमध्ये या ड्रीम 11 अॅपवर एफआयआर दाखल झाला आहे. हा एफआयआर दाखल झाल्यानंतर कर्नाटकमध्ये ड्रीम ११ ने सेवा बंद केल्याची माहिती इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे,

कर्नाटकमध्ये या आठवड्यात अंमलात आलेला कायदा, सट्टेबाजी आणि तत्सम खेळांना, म्हणजेच आर्थिक जोखीम असलेल्या खेळांना परवानगी देत नाही. सेक्वॉया कॅपिटल, मोबाईल प्रीमियर लीगसह अनेक गेमिंग अॅप्सने राज्यातील युजर्सला सेवा देणे बंद केले आहे, परंतु ड्रीम ११ हे अॅप्लीकेशन सुरूच होते.

भारताची तंत्रज्ञान राजधानी असलेल्या कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये 42 वर्षीय कॅब ड्रायव्हरच्या तक्रारीनंतर ड्रीम 11 च्या संस्थापकांविरोधात शनिवारी पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर ही “तक्रार हेतुपुरस्कर रित्या केली असावी अशी माहिती ड्रीम ११ने रॉयटर्सला दिली आहे.कंपनी त्याच्या कायदेशीर

उपायांची चाचपणी करत असल्याचं देखील समजतं आहे. “आम्ही एक जबाबदार, कायद्याचे पालन करणारी कंपनी आहोत आणि कोणत्याही अधिका-यांना आम्ही पूर्ण सहकार्य करू” कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!