Monday, October 25, 2021

खा सूजय विखे देणार नगर जिल्ह्यातील नागरिकांना सर्वात मोठी आनंदाची बातमी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: नगर शहर व जिल्ह्यातील युवक व नागरिकांना शिक्षण,नोकरी व व्यवसायिकांना स्वस्त व कमी वेळेत नगर-पुणे प्रवास करता यावासाठी आज मी दौंड ते नगर हा रेल्वे प्रवास करून रेल्वे प्रशासनाकडून माहिती घेतली असून पुढील

पंधरा दिवसात सदर अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन अहवाल सादर केला जाईल व लवकरच नगर ते पुणे रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे अशी माहिती खासदार डॉ.सुजय विखे यांनी पाहणी दरम्यान दिली.

खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दौंड ते नगर रेल्वे प्रवास करून नगर रेल्वे स्थानकावर दाखल झाले असता यांचे स्वागत करताना नगरसेवक मनोज कोतकर,ॲड.धनंजय जाधव,नगरसेवक राहुल कांबळे,रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य हर्जितसिंह वाधवा,अशोक कानडे,अमित गटणे,सुरज कुरलीये आदी उपस्थित होते.

खा.सुजय विखे पाटील म्हणाले की, नगर-पुणे रेल्वे सेवा सुरु झाल्यानंतर शहरातील व जिल्ह्यातील युवक,नागरिक दररोज प्रवास करू शकतात यासाठी डेली व मासिक पास सुरू करणार आहे.नगर मधून पुणे येथे जाण्यासाठी अवघ्या दोन तासाचा कालावधी लागणार आहे.

केंद्र सरकारने दौंड येथे तीस कोटी रुपये खर्च करून कोल्ड लाईन स्टेशन उभारले आहे.ही रेल्वे सुविधा सुरु झाल्यानंतर नगरकरांना वाहतूक कोंडीच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही याच बरोबर सुखकारक प्रवास होऊन नागरिकांची

आर्थिक बचत होईल असे ते म्हणाले.यावेळी नगर रेल्वे स्थानक व्यवस्थापक एन.पी.तोमर,आर.एस.मीना हे अधिकारी उपस्थित होते

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!