Saturday, October 23, 2021

मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणतात ती वाईट वेळ येऊ दिली जाणार नाही

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.राज्यातच नव्हे तर देशातच कोळसा टंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील औष्णिक वीज प्रकल्पांकडे दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा आहे.

मात्र, राज्यातील जनतेने काळजी करू नये. वीज निर्मितीचे मोठे आव्हान असले तरी सणासुदीच्या दिवसांत सर्वत्र भारनियमन करण्याची वाईट वेळ येऊ दिली जाणार नाही, अशी ग्वाही ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

कोळसा टंचाईमुळे वीज निर्मिती प्रकल्प अडचणीत आले आहेत. त्यातच वीज वितरण कंपनीकडून विजेचा वापर जपून करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोळशाअभावी वीज निर्मिती ठप्प होऊन राज्य अंधारात लोटले जाण्याची भीतीही व्यक्त केली जाऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री तनपुरे

यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जनतेला निश्चिंत राहण्याचे आवाहन केले आहे.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोळशाची किंमत दुपटीने वाढली आहे, त्याचा एकंदरीत परिणाम औष्णिक विद्युत केंद्रांवर झाला आणि वीजपुरवठा घटला.

राज्यातील कोळशाचा साठा वाढवा यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहोत. महाराष्ट्रात वीज पुरवठा खंडित होणार नाही यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. भारनियमन करण्याची वेळ येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही,’ असेही तनपुरे म्हणाले.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!