Friday, October 22, 2021

नगर ब्रेकिंग धक्कादायक:व्यावसायिकाने केला स्वतःच्या मुलीचा खून

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील एका व्यावसायिकाने स्वतःच्या मुलीचा खून करून तिला करोना झाला होता. त्यात तिचा मृत्यू झाल्याचे भासवून तिच्या मृतदेहाची शेजारच्या गावातील शेतामध्ये विल्हेवाट लावली.

संबंधित व्यावसायिकाला आरोग्य विभागातील एका अधिकार्‍याने मदत केल्याची चर्चा आहे. याबाबत खुनाचा प्रकार दडपण्यासाठी पैसे उकळणार्‍यांनी एका वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या नावाचा वापर केल्याचा आरोप करून या खून प्रकरणाची चौकशी करून संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा,

अशी मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड यांनी केली आहे.याबाबत अधिक सविस्तर माहिती अशी कि, तिसगाव येथील एका व्यावसायिकाने त्याची 17 वर्षाची मुलीच्या वर्तणुकीवर संशय घेवुन नातेवाईकांच्या मदतीने राहत्या

घरातच हत्या करून तिच्या मृतदेहाची दुसर्‍या गावाच्या हद्दीतील शेतामध्ये रात्रीच विल्हेवाट लावली. सकाळी गावात येऊन आमच्या मुलीला कोरोना झाला होता.त्यात तिचा मृत्यू झाला. त्यामुळे शासनानेच अंत्यसंस्कार केल्याचे लोकांना भासविले. या कामी त्या व्यवसायिकाला आरोग्य विभागातील एका अधिकार्‍याने मदत केली.

यामुळे या प्रकरणाचा तपास करून दोषी व्यक्तीवर कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करावा. अन्यथा आम आदमी पार्टीच्या वतीने बुधवार (दि. 13) रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी मुंडे यांच्या शेवगाव येथील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येईल असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!