Monday, October 25, 2021

भाजपला मोठा धक्का बसणार हा बडा नेता काँग्रेसमध्ये जाणार?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भारतीय जनता पक्षाचे खासदार वरुण गांधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सातत्यानं स्वपक्षावर आणि सरकारवर टीकेचे बाण सोडत आहेत. सिंघू सीमेवरील शेतकरी आंदोलन असो वा लखीमपूरमधील हिंसाचार, वरुण यांनी भाजप सरकारलाच लक्ष्य केलं.

त्यानंतर आता काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या स्वागताचे पोस्टर लावले आहेत. त्यामुळे वरुण गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.वरुण गांधींच्या शेतकरी आंदोलन, लखीमपूर खेरीतील हिंसाचाराबद्दल घेतलेली भूमिका पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळी आहे.

लखीमपूर हिंसाचाराची सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्य यांना पत्र दिलं आहे. या घटनेचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी संताप व्यक्त केला होता. याआधी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात त्यांनी योगींना पत्र लिहिलं आहे.

लखीमपूर हिंसाचारबद्दल संताप व्यक्त करणारे वरुण गांधी भाजप नेतृत्त्वापासून दूर जात असल्याची चर्चा आहे. गेल्याच आठवड्यात भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर करण्यात आली. त्यात वरुण आणि त्यांच्या आई मनेका गांधी यांना राष्ट्रीय

 कार्यकारणीत स्थान देण्यात आलेलं नाही. यावर वरुण यांनी कोणतंही भाष्य केलेलं नाही. मात्र शेतकऱ्यांच्या समर्थनात ते सातत्यानं ट्विट करत आहेत.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!