Friday, October 22, 2021

नगर जिल्ह्यातील संतापजनक घटना: महिलेस लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:विवाहित महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबध प्रस्थापित करून अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात खुशाल ठारुमाल ठक्कर रा. केडगाव याच्या विरोधात

बलात्कार , फसवणूक व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, जळगाव येथील विवाहित महिलेशी आरोपीचे नात्याचे संबंध होते. पिडीत महिलेचा नवरा व्यसनाधीन

असल्याचा फायदा घेत आरोपीने पिडीत महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तिला शहरातील अरणगाव रोडला राहण्यास आणले.अरणगाव येथील महिलेला तिच्या राहत्या घरी तिच्या इच्छेविरुध्द आरोपीने 2 एप्रिल 2019 ते 4 ऑक्टोबर 2021 पर्यंत या कालावधीत शारिरीक संबंध प्रस्थापित केले.

पिडीत महिलेने आरोपीस लग्नाची विचारणा केली असता, त्याने जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपी खुशाल ठारुमल ठक्कर याने पिडीत महिलेला वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर इच्छेविरुध्द शारीरिक संबंध प्रस्थापित केले असल्याचे पिडीत महिलेने फिर्यादीत म्हंटले आहे.

याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून खुशाल ठारुमल ठक्कर यांच्या विरोधात कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी कलम 376, 420, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान एप्रिल 2019 पासून ऑक्टोबर 2021 पर्यंत ठक्कर याने फिर्यादी महिलेला

 लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. तुझ्याशी लग्न करणार नाही, कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या मुलांना जिवंत सोडणार नाही, नगरमध्ये राहून देणार नाही, अशी धमकी ठक्कर याने पिडीत महिलेला दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!