Monday, October 25, 2021

नगर जिल्ह्याचे विभाजन करून या शहरात उत्तर जिल्ह्याचे मुख्यालय करावे- भाजपची मागणी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डी विमानतळाजवळ नवीन शहर वसविण्याची संकल्पना मांडून त्यासंबंधी पाहणी करण्याच्या सूचना केल्या आहेत.दरम्यान आता भाजपच्या सोशल मिडिया सेलचे उत्तर अहमदनगर जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना ई मेलद्वारे

निवेदन पाठवून ही मागणी केली आहे. या शहराला नवी मुंबई, नवी दिल्लीच्या धर्तीवर नवी शिर्डी असे नाव द्यावे आणि उत्तर जिल्ह्याचे मुख्यालय तसेच पर्यटन जिल्हा घोषित करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे अहमदनगरचा मागे पडलेला जिल्हा

विभाजनाचा मुद्दाही पुन्हा चर्चेत येणार आहे. अर्थात मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेवर अहमदनगर जिल्ह्यातून कोणत्याही पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.भाजपच्या सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष असलेल्या वाकचौरे यांनी मात्र मुख्यमंत्र्यांकडेच ही मागणी केली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, ‘नवीन शहर वसविण्याचे घोषित केले. त्याचा अतिशय चांगला उपयोग होईल. हे शहर निर्माण करताना जिल्हा मुख्यालयासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा निर्माण करता येतील. हे शहर कोपरगाव, राहता, संगमनेर तालुक्यांच्या सरहद्दीवर असेल. जिल्ह्यासाठी अग्रेसर असणारे श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव

या तालुक्यापासून समान अंतरावर असणार आहे. नवीन जिल्हा शिर्डी विमानतळाजवळ होणार असून दौंड-मनमाड रेल्वे मार्ग जवळ आहे. पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्ग जवळ असून समृद्धी महामार्गही येथून जात आहे. उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा महामार्ग येथून जातो. शिवाय प्रस्तावित सुरत-चेन्नई राष्ट्रीय

महामार्ग येथून जाणार आहे. यामुळे हवाई, रेल्वे, भूमार्गच्या दृष्टीने परिपूर्ण जिल्हा असेल. हा पर्यटन समृद्ध जिल्हा होईल. नवीन तयार होणारे शहर हे उत्तर नगर जिल्ह्याचे केंद्र करून शिर्डी हा नवीन जिल्हा करावा आणि पर्यटन जिल्हा म्हणून त्याचा विकास करावा.’ असे या निवेदनात म्हटले आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!