Friday, October 22, 2021

नगर जिल्ह्यात नेते व कारखानदारांसाठी लाचारांच्या फौजा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्हा क्रांतिकारी चळवळीचा जिल्हा म्हणून ओळखला जात होता. आता मात्र या जिल्ह्यात लाचारांची फौज तयार झाली असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली.

शेवगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मारुतराव घुले पाटील मंगल कार्यालय येथे मंगळवारी शेतकरी मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. मेळाव्यास वस्त्राद्योग महामंडळाचे माजी सदस्य रविकांत तुपकर, स्वाभिमानीचे प्रकाश बालवडकर,

अमरसिंह कदम, अंबादास कोरडे, माजी सभापती दिलीप लांडे, रावसाहेब लवांडे, सुनिल लोंढे, शरद मरकड, प्रशांत भराट, बाळासाहेब फटांगडे, दत्ता फुंदे, स्नेहल फुंदे, प्रविण म्हस्के, भाऊ बैरागी, बाप्पूसाहेब राशीनकर, संदीप बामदळे, संजय नांगरे, सुनील काकडे, अशोक भोसले, संदीप मोटकर, दादा टाकळकर आदी उपस्थित होते.

या भागातील कारखाने कायदा तुमच्या बाजूने असूनही एक वर्षापासून एकरकमी पैसे देवू शकलेले नाहीत. तीन तुकडे करुन तुमच्या पदरात पैसे कधी पडतील याचा विचार करा. रस्त्यावरची तुमची लढाई तुम्हालाच लढावी लागणार आहे. कारण सैन्य कधीही भाडोत्री मिळत नाही.

आणि भाडोत्री सैन्य कधी प्रामाणिक राहत नाही, असा सल्लाही शिट्टी यांनी शेतकऱ्यांना दिला.सरकारचा व्यापारी, दलाल, उदयोगपती व कारखानदारांवर वचक नसल्याने ते शेतकऱ्यांना एफ.आर.पी मध्ये वजन काटयात, साखर उताऱ्यात भर दिवसा लुबाडत आहेत. हा दिवसा ढवळया तुमच्या मालावर टाकलेला दरोडा आहे.

तो दरोडा यशस्वी होतो कारण त्यामध्ये स्थानिक कार्यकर्ते आणि सरकारचे प्रतिनिधी सामील झाले आहेत. केंद्र सरकारने पूर्वीचा एफ.आर.पी.चे पैसे एकर कमी देण्याचा निर्णय बदलून आता त्याचे तीन तुकडे पाडून कारखानदारांना एक प्रकारे पळवाट दिली आहे असे ही शेट्टी म्हणाले.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला पळवून नेले

    माय महाराष्ट्र न्यूज:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. 19 ऑक्टोबर रोजी घडली.अहमदनगर जिल्ह्यातील...

जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना नगरचे पालकमंत्री जनतेला लुटत होते

माय महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका...

विखे-पाटील यांना नैराश्याने ग्रासले

माय महाराष्ट्र न्यूज : भाजपचे तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धती देशाच्या, जनतेच्या हिताची नाही. त्यामुळे राज्यात किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार येत्या महापालिका...

बापरे:कोरोनाचा नव्या रुपातील विषाणू आढळून आला

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे शंभर कोटीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त डॉ. मांडे यांच्याशी सीएसआयआर मुख्यालयात सकाळने संवाद साधला. कोरोनाचा नव्या रुपातील...

नगरमध्ये दोन भावांकडून महिलेची छेडछाड लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत…

माय महाराष्ट्र न्यूज:दोन भावांनी एका विधवा महिलेची छेडछाड करीत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून विकास शामसुंदर गायकवाड...

फडणवीसांची जिरवायची हे गडकरींसोबत आधीच ठरलं होत: काँग्रेस नेत्यांचा खळबळजनक दावा

माय महाराष्ट्र न्यूज:नांदेड इथल्या बिलोली येथे आयोजित प्रचारसभेत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाला बहुमत जरी...
error: Content is protected !!