Wednesday, October 27, 2021

कितीही भूछत्रासारखे उगवले तरी काही फरक पडत नाही :चंद्रशेखर पाटील कदम

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील शांताबाई कदम सांस्कृतिक भवन येथे भाजपा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला.गावाने माझ्यावर खूप प्रेम केले. मला आमदारकी मिळवून दिली.

माझ्यावर जनतेचा विश्वास आहे म्हणून येथील एकहाती सत्ता आमच्याकडे दिल्या. आज जनता आमच्या पाठिशी आहे. त्यामुळे कोणी कितीही कोल्हेकुई केली आणि कितीही भूछत्रासारखे उगवले तरी काही फरक पडत नाही. येणार्‍या निवडणुकीत आमचा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी केले.

सत्यजित कदम म्हणाले, मागील वेळेप्रमाणे यावेळी देखील सोसायटी, नगरपालिका आदी निवडणुका लढवायच्या आहेत. निवडणूक आली की, काही भूछत्राप्रमाणे बाहेर येतात. मागीलवेळी जनतेने सोसायटी व नगरपालिकेची एकहाती सत्ता दिली.

साडेतीन वर्षे लोकाभिमुख विकासकामे केली व आतापर्यंतचा सर्वात जास्त निधी आणला. आजही जनता आपल्यासोबत आहे. येथून पुढे नूतन पदाधिकार्‍यांची जबाबदारी वाढली आहे. जाणार्‍यांपेक्षा येणारांची यादी मोठी असल्याचे कदम म्हणाले.

यावेळी दिलीप भालसिंग, बाळासाहेब महाडिक, रवींद्र म्हसे, अमोल भनगडे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्तविक गटनेते सचिन ढुस यांनी केले. सूत्रसंचालन व आभार माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक प्रकाश संसारे यांनी मानले.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!