Monday, October 25, 2021

खा विखेंचा खोचक टोला: किती पैसे आले व किती पैसे गेले बॅलन्स सीट जुळल्यानंतर पालकमंत्री जिल्ह्यात येतील

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून तातडीची आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

या उपोषणामध्ये खासदार डॉ. सुजय विखे यांच्यासह भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री प्रा. राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा. भानुदास बेरड आदी सहभागी झाले होते. यावेळी भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघडीवर जोरदार टीका केली.

नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे त्यांचे बॅलन्स शीट चेक करत आहेत. ते त्यांचे अकाउंट बुक पाहत आहेत. नेमके किती पैसे आले आणि किती पैसे गेले, याचा ते शोध घेत आहेत. ते एकदा सापडल्यानंतर पालकमंत्री नगर जिल्ह्यात येतील,’ असा घणाघात खासदार डॉ. सुजय विखे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केला.

भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप केला आहे. त्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ हे नगर जिल्ह्यामध्ये केवळ

एका शासकीय कार्यक्रमासाठी आले होते. तसेच त्यांनी नगर जिल्ह्यातील आपला दौरा रद्द केला होता. याशिवाय नगर जिल्ह्याच्या काही भागात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्याभागात ही हसन मुश्रीफ यांनी अद्याप भेट दिली नाही.

या पार्श्वभूमीवर बोलताना आज खासदार विखे यांनी मुश्रीफ यांच्यावर तोफ डागली.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!