Saturday, November 27, 2021

त्याने महिला डॉक्टरच्या संसारात कालवली माती;व्हिडीओ कॉलवर नग्न होण्यास भाग पाडलं अन्…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:गुजरातमधील एका तरुणाने पुण्यातील एका विवाहित महिला डॉक्टरसोबत विकृत कृत्य केलं आहे. आरोपी तरुणाने पीडित महिलेला व्हिडीओ कॉलवर नग्न होण्यास भाग पाडून, संबंधित व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल केले आहेत.

आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडित महिलेच्या नवऱ्याला देखील अश्लील व्हिडीओ पाठवून बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे.प्रणव अरविंद पांचाळ असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी तरुणाचं नाव असून तो गुजरातमधील वडोदरा

जिल्ह्यातील अटलादरा येथील रहिवासी आहे. याप्रकरणी 36 वर्षीय पीडित महिलेनं वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला विवाहित असून ती एक डॉक्टर आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी पीडितेची आरोपी प्रणव पांचाळ याच्याशी ओळख झाली होती.

आरोपी पांचाळने पीडित महिलेचा विश्वास संपादन करत तिला लग्नाचं आमिष दाखवलं. तसेच व्हॉट्सअॅपवरून व्हिडीओ कॉल करून तिला कपडे काढण्यास भाग पाडलं आहे. यानंतर आरोपीनं पीडित महिलेचा अश्लील व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये स्क्रिन रेकॉर्ड केला. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही,

तर त्याने हा अश्लील व्हिडीओ पीडित महिलेच्या इमेल आयडीवर पाठवला. तसेच तिच्या नवऱ्याला देखील हा व्हिडीओ पाठवून बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे.याव्यतिरिक्त नातेवाईकांना व्हिडीओ पाठवून बदनामी करण्याची धमकी आरोपीनं दिल्याचं पीडितेनं आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे.

फिर्यादी डॉक्टर महिलेचं सहा महिन्यांपूर्वी लग्न झालं असून, 2 मार्च 2020 ते 8 ऑक्टोबर 2021 या कालावधीत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेनं वाकड पोलीस ठाण्यात धाव घेत, आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलीस तांत्रिक माहितीच्या आधारे घटनेचा तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!