अहमदनगर
शिक्षक संपावर गेल्याने शाळा बंद पडून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आदर्श गाव हिरवे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार हे दस्तूर खुद्द विद्यार्थ्यांचा वर्ग घेऊन ज्ञानदानाचे काम करीत आहेत.
पद्मश्री पोपटराव पवार हे हातात पुस्तक घेऊन हिवरे बाजार येथील शाळेत मुलांना शिकवत असलेला फोटो सामजिक माध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहे.लोकप्रतिनिधी हा मतांचे राजकारण करणारा नसावा तर पद्मश्री पोपटराव पवार यांचे सारखा जनतेच्या कल्याणाचा विचार करणारा असावा अशी प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली आहे.