Tuesday, November 30, 2021

सूजय विखेंना नगर-मनमाड रस्त्यावरील खड्डे त्यांना दिसत नाहीत का?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात नगर तालुक्यातील महावितरणाच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपने केलेल्या आंदोलनावर जोरदार टिका केली.

भाजपचे उपोषण हे निव्वळ स्टंटबाजी होती. सकाळी नाष्टा करून उपोषणाला आले आणि दुपारी जेवण करण्यासाठी घरी निघून गेले, या शब्दात मंत्री तनपुरे यांनी भाजपच्या उपोषणाची खिल्ली उडवली.

जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत टीका करणार्‍या खा.विखेंना नगर-मनमाड रस्तावरील खड्डे दिसतात की नाही? या रस्त्यासाठी त्यांनी केंद्रात जोर लावावा. आपले ठेवायचे झाकून आणि दुसर्‍याचे पाहायचे वाकून अशी ही वृत्ती असल्याची टीकाही त्यांनी केली.

शेतकर्‍यांची काळजी होती, तर निदान रात्रभर तरी उपाषणस्थळी बसणे आवश्यक होते. उपोषण मी देखील केलेले आहे. त्यावेळी रात्रभर अंगावर पाऊस घेतलेला आहे. तसेच भाजपच्या उपोषणकर्त्यांना जास्तच हौस असेल तर त्यांनी दिल्लीत उपोषण करावे, म्हणजे शेतकर्‍यांना भरपाईसाठी

जास्त पैसे मिळतील. त्यांनी उपोषण करण्याआधीच महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांसाठी दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. यामुळे उपोषणकर्त्यांनी किमान माहिती घेवून आंदोलन करावे, असा सल्ला त्यांनी दिला.

नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री आले नाहीत. या मुद्यावरून खा. विखे यांनी पालकमंत्री बॅलेन्शीट तपासण्यात व्यस्त असल्याची टीका केली होती. त्याला उत्तर देतांना मंत्री तनपुरे म्हणाले, पालकमंत्री हसन मुश्रीफ हे वैद्यकीय कारणामुळे जिल्ह्यात येवू शकले नाही. मात्र, आम्ही पाहणी दौरा केला. ना.मुश्रीफ हे वयाने

ज्येष्ठ व अभ्यासू नेते आहेत. आमची त्यांच्यावर श्रध्दा आहे. किमान त्यांच्या वयाचा विचार करून बोलावे. आपले बॅलेन्शीट तपासले जाईल, यासाठी आधीच काही लोक भाजपमध्ये गेले. त्यांनी दुसर्‍यांच्या बॅलन्सशीटची चिंता करू नये असे तनपुरे म्हणाले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!