Friday, December 3, 2021

विखे पाटील म्हणाले शरद पवारांना मी स्वत: पत्र लिहीले; परंतु ते याचे उत्तर देऊ शकले नाहीत

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भाजप सरकारच्या काळातच निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामांची सुरुवात मुखापासुन होण्यास गती मिळाली, परंतु वर्षानुवर्षे ज्यांच्या ताब्यात सत्तास्थाने होती, त्यांच्याकडून निळवंडे कालव्यांची कामे सुरु होवू शकली नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. कालव्यांच्या कामाला कोणाचाच विरोध

नाही; परंतु दिशाभूल करुन, श्रेयवाद लाटण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे, असा टोला भाजपा नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.पिंप्री निर्मळ येथे सुमारे एक कोटी 16 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा आमदार विखे पाटील यांच्या उपस्थितीत झाला.

जनसेवा ग्रामविकास मंडळाचे जालिंदर निर्मळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास सभापती नंदा तांबे, सभापती भाऊसाहेब जेजूरकर, सरपंच डॉ. मधुकर निर्मळ, उपसभापती बाळासाहेब जपे, चेअरमन भाऊसाहेब घोरपडे, उपसरंपच वनिता घोरपडे, गटविकास आधिकारी समर्थ शेवाळे, उपअभियंता

नानासाहेब वाघमारे, एन. टी. निर्मळ आदी उपस्थित होते. डॉ. शिवम निर्मळ, डॉ. प्राप्ती पारखे, डॉ. श्रीकांत घोरपडे या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल आ. विखे पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डिजीटल अंगणवाडीचे लोकार्पण आणि कोविड योद्ध्यांचा सन्मान ग्रामस्थांतर्फे करण्यात आला.

संगमनेर तालुक्यात कालवे पूर्ण झाले तरच राहाता तालुक्यात पाणी येणार आहे. त्यामुळे कालव्यांच्या कामांना कोणाचाही विरोध नाही; परंतु दिशाभूल केली जाते. यामध्ये आपले स्थानिक लोकही बळी पडतात यामधील वास्तव समजून घेण्याची गरज आ. विखे यांनी बोलून दाखविली.

बंद पडलेला गणेश कारखाना प्रवरेने चालविण्यास घेतला; परंतु काहींनी याला कॅन्सरची उपमा दिली. अनेकजण यासाठी आता न्यायालयात गेले आहेत. लोकांसाठी करत असलेल्या कामात विघ्न कोण आणत आहे, हे आता लोकांनी ओळखले पाहिजे. रयतमध्ये नोकरीला लावण्यासाठी घेतल्या गेलेल्या

पैशांची प्रकरणे चव्हाट्यावर आली. आज संस्थेतील कर्मचारीच फरार झाला आहे. या भ्रष्टाचाराबाबतही लोकांनी प्रश्न विचाराले पाहिजेत, जेष्ठ नेते शरद पवार यांना याबाबत आपण स्वत: पत्र लिहीले; परंतु ते याचे उत्तर देऊ शकले नाहीत, असे आ. विखे पाटील म्हणाले.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!