Friday, December 3, 2021

नगरमध्ये घोषणा केलेल्या मंत्री गडकरी यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अडचणीत; शेतकऱ्यांनी घेतली ही भूमिका

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा महत्त्वाकांक्षी सुरत-हैद्राबाद ग्रीन फिल्ड महामार्गासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनींचे भाव आधी जाहीर करावेत, त्यानंतरच जमिनी देऊ, अशी भूमिका नगर जिल्ह्यातील

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी घेतली आहे. मंत्री गडकरी यांनी नगर जिल्ह्यातील कार्यक्रमातही या महामार्गाची घोषणा केली होती. त्यानंतर आता नगर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या मागण्या केल्या आहेत.

केंद्र सरकारचा महत्त्वाकांशी ग्रीन फिल्ड महामार्ग नगर जिल्ह्यातील ४९ गावांतून जाणार आहे. त्यासाठी सुमारे १२५० हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. यासाठी जमिनीचा भाव ठरवण्याचा मुद्दा आता पुढे आला आहे. सरकारने निश्चित

 केलेली पद्धत या शेतकऱ्यांना मान्य नाही. त्यामुळे प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी शेतकऱ्यांचं मत विचारात घेतलं जावं, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.या भागातील शेतीचा बाजारभावाप्रमाणे दर रेडीरेकनरपेक्षा पाच ते दहा पट जास्त आहे.

मात्र, रेडीरेकनरनुसार सरकारकडे याची नोंद कमी लावण्यात आलेली आहे. नियमानुसार सरकारकडील नोंदींच्या आधारे भूसंपादनाचे दर ठरवले जाणार आहेत, हे शेतकऱ्यांना मान्य नाही. त्यामुळे कोणतीही प्रक्रिया सुरू करण्याआधी जी जमीन घ्यायची आहे, ते दर आधी जाहीर करावेत. त्याला ग्रामसभेची

मान्यता घ्यावी आणि नंतरच प्रक्रिया सुरू करावी, अशी प्रमुख मागणी या शेतकऱ्यांची आहे.याशिवाय भूसंपादन करताना अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे विभाजन होणार आहे. काहींची जमीन विचित्र अकारात शिल्लक राहते. अशा परिस्थितीत

तेथे शेती करणे अवघड होते. अशा शेतकऱ्यांना आधीच विश्वासात घेऊन त्यांना योग्य मोबदला मिळावा. शेतातील शिवार रस्ते बंद होणार नाहीत, यासाठी उपाय होणे आवश्यक आहे. गाडीवाटा आणि शिवार रस्ते बंद झाले तर अनेकांना शेताकडे जाणे शक्य होणार नाही.

त्यामुळे यासंबंधीही योग्य ते धोरण ठरवण्यात यावे. जेथे विभाजन होणार आहे, तेथे भुयारी मार्ग करून देण्यात यावेत. तसंच सर्व मागण्यांसंबधी शेतकऱ्यांशी चर्चा करावी, त्यातून योग्य तो मार्ग काढून त्यानंतरच प्रक्रिया सुरू करावी. अधिसूचनेत काही त्रुटी राहिल्या असल्यास त्या दूर कराव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!