Wednesday, December 8, 2021

नगर जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप:भाजप व भारीप नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसने राज्याप्रमाणेच अहमदनगर शहरातही स्वबळाचा नारा दिला आहे. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस आतापासूनच कामाला लागले आहे. त्यासाठी काँग्रेसने अहमदनगर शहरातील विविध पक्षाच्या नेत्यांचा

मुंबईत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला.अहमदनगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीला अजून दोन वर्षांचा कालावधी बाकी आहे. नगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये हे इन्कमिंग झाले. मुंबईतील

काँग्रेस प्रदेश कार्यालय टिळक भवन येथे भारतीय जनता पार्टीच्या शहर अल्पसंख्याक आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष जुबेर बाबामिया सय्यद, भिंगार भारिप बहुजन महासंघाचे माजी शहराध्यक्ष सागर चाबुकस्वार, पद्मशाली समाजाचे नेते नारायण कोडम ,

समाजवादी पार्टीचे माजी शहर मुख्य संघटक हनिफ मोहम्मद शेख आदी नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे.किरण काळे यांच्यावर बाळासाहेब थोरात

यांनी जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविल्या नंतरचा अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसमधील मुंबईत पार पडलेला हा पहिलाच पक्ष प्रवेश सोहळा आहे. यावेळी महसूल मंत्री थोरात, आमदार पटोले यांनी विविध पक्षातून काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व नेत्यांना काँग्रेसचा पंचा घालत त्यांचे पक्षात स्वागत केले.

या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सचिव सचिन गुंजाळ, प्रदेश सचिव देवानंद पवार, महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक काँग्रेसचे नेते तथा प्रदेश महासचिव निजाम जहागीरदार, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, प्रवीण गीते पाटील, युवक काँग्रेस

अध्यक्ष ॲड.अक्षय कुलट आदी यावेळी उपस्थित होते.काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना महापालिकेत आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र या आव्हानाला आमदार संग्राम जगताप काय प्रतिउत्तर देतात या बाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!