माय महाराष्ट्र न्यूज:देशातील सूतगिरण्या आणि कापड उद्योग जवळपास पूर्ण क्षमतेने सुरु आहे. उद्योगांचा कापूस वापरही उचांकी पातळीवर होत आहे.
त्यातच देशातील कापूस उत्पादनाचे अंदाज महिन्याला कमी होत आहेत.तर दुसरीकडे मागील महिनाभरापासून कापसाचे भाव दबावात होते. पण कापूस उत्पादन घटीचा अंदाज आल्यानंतर कापूस दरात काहीशी सुधारणा झाली.
तर आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दरात आणखी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.देशातील कापूस उत्पादन यंदा घटलं. मागील हंगामात शेतकऱ्यांना कापसाला
जुलैनंतर १२ हजार ते १३ हजार रुपये भाव मिळाला होता. यंदाही हाच भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र ऐन हंगामात कापसाची भाव कमी झाले होते.नोव्हेंबर महिन्यात सरासरी ९ हजारांचा
असणारा भाव डिसेंबरपासून ८ हजार ५०० रुपयांवर आला. त्यानंतर दरात काहीचे चढ उतार झाले. पण जानेवारीपासून कापूस दरातील नरमाई कायम आहे.कापूस उत्पादनाचा अंदाज कमी झाल्यानंतर कापूस दरात
क्विंटलमागं १०० ते २०० रुपयांची सुधारणा झाली. सध्या कापसाला सरासरी ७ हजार ९०० ते ८ हजार ३०० रुपये भाव मिळतोय. बाजारातील आकेचा दबाव पुढील महिनाभर राहण्याचा अंदाज आहे.देशातील सूतगिरण्या आता ९५ टक्के क्षमतेने
सुरु असून महिन्याला २८ ते ३० लाख गाठी कापसाचा वापर होत आहे. उद्योगांना सध्या गरजेप्रमाणे कापूस मिळत आहे. एरवी शेतकरी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात कापसाची विक्री करतात.
पण यंदा शेतकऱ्यांनी या दोन महिन्यांत कापासाची मर्यादीत विक्री केली. पण फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कापूस आवक वाढली. कापूस आवकेचा दबाव सध्या दरावर आहे.
त्यानंतर मात्र आवक मर्यादीत राहून दर सुधारु शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला