माय महाराष्ट्र न्यूज:शेवगाव तालुक्यातील रांजणी येथील ह भ प बाळासाहेब नवथर यांची नात व सोपान नवथर यांची मुलगी कु. हिंदवी हिचा चतुर्थ वाढदिवस जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील
विद्यार्थ्यांना विविध शालेय साहित्य वाटप करून साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक किसन चव्हाण हे उपस्थित होते असे उपक्रम समाजाला बळ देतात व विद्यार्थ्यांचे मनोबल
वाढवतात असे प्रतिपादन प्रा. किसन चव्हाण यांनी केले तसेच त्यांनी शाळेची पहाणी करून शाळेतील सर्व स्टाफ व विद्यार्थ्यांचे कौतुक केले .कार्यक्रमा पूर्वी मा. आ. चंद्रशेखर घुले पाटील यांनी फोन द्वारे हिंदवीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .
तर या उपक्रमामुळे आमच्या विद्यार्थ्यांना आनंद झाला असल्याचे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक बशीर शेख यांनी व्यक्त केले यावेळी राम घुले व राम शिदोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रा. विकास थोरात यांनी पाहुण्यांचे
स्वागत व कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले .कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक काळे सर, अडकित्ते सर, पठाडे मॅडम, कसबे मॅडम ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ कर्डिले, योगेश गवळी, संभाजी घुले तसेच श्याम दादा कांबळे संजय कुऱ्हाडे, दादा गायके,
राहुल घुले, साईनाथ कचरे, बाळासाहेब कचरे, कृष्णा थोरात, वाल्मीक जीवडे, गणेश शिदोरे, भारत औटी, पै रवी काळे, पांडुरंग शिदोरे, संतोष कांबळे, ज्ञानेश्वर चव्हाण, बाप्पू कांबळे, गणेश कचरे, दत्ता तनपुरे, पांडुरंग नवथर, प्रसाद नवथर, संदीप थोरात,
राम गवळी यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पद्माकर थोरात यांनी सूत्रसंचालन केले व शितल नवथर यांनी आभार मानले.
*बातमी व जाहिरातीसाठी संपर्क: पत्रकार राहुल कोळसे भेंडा 8484083200*