Thursday, January 20, 2022

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर शहरात दोन ठिकाणी छापा टाकून अवैध व्यवसाय करणाऱ्या तिघांना

अटक केली आणि तीन महिलांची सुटका केली.डीवायएसपी मिटके यांच्या पथकाला शहरातील उपनगरांत सुरू असलेल्या या अवैध व्यवसायाची माहिती मिळाली होती. सावेडीतील वाणीनगर आणि केडगावमधील अंबिकानगरमध्ये चांगल्या वस्तीत फ्लॅट भाड्याने घेऊन तेथे

परप्रांतीय महिलांना आणले होते. त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. ही माहिती मिळाल्यावर पोलिसांनी एकाच वेळी दोन्ही ठिकाणी छापे टाकले. सावेडीत टाकण्यात आलेल्या छाप्यात दीपक एकनाथ लांडगे व सागर जाधव यांना

अटक करण्यात आली त्यांच्या ताब्यातून एका महिलेची सुटका करण्यात आली. केडगावमधील छाप्यात योगेश पोपट ओव्हाळ (रा. माळीवाडा अहमदनगर ) याला अटक करण्यात आली. तेथून दोन महिलांची सुटका करण्यात आली. या आरोपींविरूद्ध महिलांचा

अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यातील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.पोलिसांना संशय येऊ नये म्हणून उपनगरातील उच्चभ्रू वस्तीमध्ये भाड्याने फ्लॅट घेऊन महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. पोलिस अधीक्षक मनोज पाटील

यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संदीप मिटके, पोलिस निरीक्षक संपत शिंदे, ज्योती गडकरी, समाधान सोळंकी, राजेंद्र आरोळे, सुरेश औटी, अमोल शिरसाट, चेतन मोहिते, गौतम सातपुते, सचिन जाधव, जयश्री सुद्रिक, प्रियंका भिंगरदिवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!