Thursday, January 20, 2022

नगर जिल्ह्यात भाजपाला मोठे खिंडार ;शेकडो कार्यकर्त्यांचा मंत्री गडाखांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सत्ता व पैसा यापेक्षा माणसे महत्त्वाची आहेत, असे प्रतिपादन ना. शंकरराव गडाख यांनी केले.अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील शिंगवेतुकाईचे माजी सरपंच योगेश होंडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यानी ना. शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीतून शिवसेनेत प्रवेश केला.

त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.शिंगवेतुकाईसह परिसरातील गावे अवर्षणप्रवण क्षेत्रातील आहेत. या गावांवर माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे विशेष प्रेम आहे. मीही कायम या परिसराच्या विकासासाठी कटिबद्ध आहे एमआयडीसीच्या उभारणी

प्रसंगी होणारा विरोध मी आपणा सर्वांना सोबत घेऊन समन्वयाने सोडवला याचा आज परिणाम आपल्या सर्वांना दिसतो आहे. यामुळे गावाच्या व परिसराच्या अर्थकारणाला गती मिळाली आहे. विकास कामे करताना सूडबुद्धी ठेवून काम करण्याऐवजी सर्वांची कामे करण्यासाठी प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ नेते मा. खा. यशवंतरावजी गडाख व ज्येष्ठ नेते स्व. वसंतराव होंडे यांनी एकमेकांना विरोध केला. परंतु जनतेच्या हितासाठी सदैव एकत्र येऊन भूमिका घेतली. स्व. वसंतराव होंडे यांच्या नातवाने शिवसेनेत प्रवेश केला याचा सर्वाधिक आनंद यशवंतरावजी गडाख यांना झाला.

असेही गडाख म्हणाले. विकासासाठी व जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव आग्रही भूमिका घेऊ अशी ग्वाही दिली.माजी सरपंच योगेश होंडे म्हणाले ही भूमिका यापूर्वीच घ्यायला हवी होती त्यासाठी उशीर झाला परंतु आता नामदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली शिंगवेतुकाई व परिसरातील शिवसेना पक्षाचे काम वाढवण्यासाठी प्रयत्न करू.

श्रीकांत पवार, शक्ती पुंड, एकनाथ पवार, सुधीर होंडे, राजेंद्र होंडे, योगेश संजय होंडे, गणेश होंडे, भाऊसाहेब होंडे, उद्धव होंडे, राहुल गवळी, अमृत दिघे, गणेश दिघे, उत्तम पवार, शॉल गायकवाड व इतर मित्रपरिवार यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
प्रास्ताविक

माजी सरपंच एकनाथ पवार यांनी केले याप्रसंगी बद्रीनाथ खंडागळे, आदिनाथ काळे, शिवसेना तालुका प्रमुख मच्छिंद्र म्हस्के , अशोकराव येळवंडे, योगेश गुंड, पांडुरंग होंडे, सुदामराव तागड, बाळासाहेब सोनवणे, माजी सभापती कारभारी जावळे, डॉ.सुनील वैरागर, सुहास गोंटे, रतीलाल गांधी आदींनी मनोगत व्यक्त केले.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!