Sunday, July 3, 2022

मोबाईलमध्ये फोटो काढून ही मागणी तरूणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नाची मागणी करणाऱ्या तरूणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना नगर शहरात घडली.मयत मुलीच्या आईने फिर्याद दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,गेल्या

वर्षापासून मुन्ना शेख हा पीडित मुलीला त्रास देत होता. शेख याने पीडित मुलीचे मोबाईलमध्ये फोटो काढून लग्नाची मागणी केली होती. लग्न करावे यासाठी शेख याने पीडिताचा दुचाकीवरून पाठलाग करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

शेख याच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने ता. 20 ऑक्‍टोबर रोजी विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर तिला तिच्या कुटुंबियांनी उपचारासाठी प्रारंभी एका खासगी रूग्णालयात दाखल केले. तीन दिवस तेथे उपचार केल्यानंतर कुटुंबाची आर्थिक

परिस्थिती हालाखीची असल्याने तिला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असताना बुधवारी (ता.27) पहाटे तिचा मृत्यू झाला. ही बाब तिच्या नातेवाईकांना समजताच जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या आवारात त्यांनी मोठी गर्दी झाली होती.

आरोपीवर तातडीने गुन्हा दाखल करून त्यास अटक करावी, अशी मागणी तिच्या कुटुंबियांनी व नातेवाईकांनी केली. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. कोतवालीचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे, तोफनाखा पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी,

उपनिरीक्षक इंगळे यांनी जिल्हा रूग्णालयात जाऊन मयत मुलीच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. तसेच याबाबत तातडीने गुन्हा दाखल करण्यात येईल. आरोपीचा शोध घेण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. दरम्यान, गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करावी, या मागणीसाठी

नातेवाईकांनी मृतदेह कोतवाली पोलिस ठाण्यात आणला होता.तीन दिवस तेथे उपचार केल्यानंतर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने तिला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. ही बाब तिच्या नातेवाईकांना समजताच

सकाळ पासून जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या आवारात मोठी गर्दी झाली होती. आरोपीवर तातडीने गुन्हा दाखल करून त्यास अटक करावी, अशी मागणी तिच्या कुटुंबियांनी व नागरिकांनी करत जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा

पवित्रा घेतला होता. पोलिसांनी सायंकाळी तरूणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इंगळे करीत आहे.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!