Tuesday, January 18, 2022

अनेक वर्षे दिल्लीला चकरा मारून जाणत्या राजांना जे जमले नाही ते मोदी सरकार करतंय: विखे पाटील

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या 72 व्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमात भाजपाचे ज्येष्ठ नेते व आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात सहकार मंत्री अमित शहा

यांच्यासमवेत झालेल्या सकारात्मक निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करून केंद्र सरकारचे आभार मानले. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, व्हा.चेअरमन विश्वासराव कडू, प्रवरा बॅकेचे चेअरमन अशोक म्हसे,

ट्रक वाहतूक सोसायटीचे चेअरमन नंदू राठी, जिल्हा परिषद सदस्या रोहिणी निघुते, कामगार नेते ज्ञानदेव आहेर यांच्यासह सर्व संचालक, शेतकरी, सभासद, अधिकारी, कामगार उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या माध्यामातून होत असलेल्या निर्णयामुळे सहकारी साखर कारखानदारीला नवसंजीवनी मिळत आहे. अनेक वर्षे दिल्लीला चकरा मारून जाणत्या राजांना काही करता आले नाही त्या प्रश्नांबाबत

केंद्र सरकार आता सकारात्मक निर्णय घेत असल्याचे प्रतिपादन आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी गळीत हंगाम शुभारंभाप्रसंगी केले.आ. विखे पाटील म्हणाले की, राज्यातील सहकारी साखर कारखान्यांवर आयकाराची टांगती तलवार मागील 50 वर्षांहून अधिक काळ होती. जाणते राजे 25 वर्षे दिल्लीत होते.

फक्त दिल्लीत या असा निरोप यायचा पण निर्णय कोणतेच झाले नाही. आज सहकारी साखर कारखान्यांचे सर्व प्रलंबित प्रश्न देशाचे सहकार मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली मार्गी लागत असल्याकडे लक्ष वेधले.दोन दिवस दिल्लीत झालेल्या बैठकांतून राज्यातील सर्वच सहकारी साखर कारखान्यांना

मोठा दिलासा मिळणार असल्याचे विखे म्हणाले.राज्यातील सहकारी साखर कारखानदारी संकटाचा सामना करीत वाटचाल करीत असली तरी ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या विश्वासावर या चळवळीने साध्य केलेल्या प्रयत्नांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून नवसंजीवनी मिळत असल्याचे विखे यांनी आवर्जून सांगितले .

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!