Monday, July 4, 2022

मतदारसंघात फिरायला आमदार रोहित पवारांना पोलीस बंदोबस्त कशासाठी ?

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मतदारसंघात फिरायला आमदार रोहित पवारांना पोलीस बंदोबस्त कशासाठी? असा सवाल भाजप नेते दादासाहेब सोनमाळी यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की नव्या पर्वाची आगळी वेगळी सुरुवात झाली असून

ऐन दिवाळीच्या तोंडावर रोहीत्रांचा वीज पुरवठा खंडित केला आहे, यामुळे तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी, वीज बिल भरायचे की दिवाळी साजरी करायची ?असा प्रश्न तालुक्यातील

शेतकरी व जनतेला पडला आहे. खंडीत वीज पुरवठयामुळे तर लोक प्रतिनिधी पोलीस बंदोबस्तात फिरत नाहीत ना? असा सवाल श्री सोनमाळी यांनी उपस्थित केला आहे.गेल्या दोन वर्षांत कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघातील अनेक गावांत मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहेत.! असा

गवगवा ते सोशल मीडियात करत आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर कर्जत तालुक्यातील शेती पंप व घरगुती कनेक्शन असलेल्या अनेक रोहीत्रांचा वीज पुरवठा महावीतरणने तोडला आहे. वीज बिल भरणा केला तरच वीज कनेक्शन जोडता येईल असे अधिकारी स्पष्टपणे सांगत आहेत. यामुळे विहिरीत

पाणी असून ते पिकांना देता येत नाही, यामुळे पिके जळू लागली आहेत. दिवाळी करायची की बिल भरायची अशा दुहेरी समस्येमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. गेली दोन वर्षे विकास कामाची पद्धत पाहीली असता आमदार रोहित पवार यांनी आता पर्यन्त एकही मोठे काम केले नाही. भिंती, सोशल मीडिया व कागदावरच

सध्या विकास चालू आहे. पुर्वी मंजूर झालेली कामे सध्या सुरू आहेत. ती कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत. याला जबाबदार कोण? असा सवाल श्री सोनमाळी यांनी उपस्थित केला आहे. एकंदरीत सध्या तरी लहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार अशी स्थिती निर्माण झाली आहे.

त्यांनी पुढे नमूद केले आहे की येत्या सहा महिन्यांत माजी मंत्री राम शिंदे यांचे डोळे पांढरे होतील असे आपण म्हणाला होतात, तुम्हीच पोलीस बंदोबस्त घेऊन फिरतात? आपल्या कार्यपद्धतीमुळे जनतेचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. कर्जत तालुक्यातील प्रांत अधिकारी, तहसीलदार, पोलीस

अधिकारी, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी हे शासकीय नोकर आहेत की राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत असा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडला आहे. असे ते म्हणाले.

ताज्या बातम्या

नेवासा शहरात 45 हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची 8 जनावरे पकडली

नेवासा नेवासा शहरात 45 हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची 8 जनावरे नेवासा पोलिसांनी पकडली आहेत. याबाबद पोकॉ रवि गोविंद पवार सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हंटले...

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...
error: Content is protected !!