Monday, July 4, 2022

सौंदाळा ग्रामपंचायतीकडून दिवाळी निमित्त गावकऱ्यांना 41 क्विंटल साखरेचे वाटप

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतीने गावातील नागरिकांना कुटुंबातील प्रती व्यक्ती 1.5 किलो प्रमाणे सर्वाना समान साखर वाटप करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेत 41 क्विंटल साखर वाटून ग्रामस्थांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला आहे.

सध्या बाजारात ३८ रुपये किलोप्रमाणे मिळणारी साखर कोणतीही अट न ठेवता सरसकट प्रतिव्यक्ती 1.5 किलो प्रमाणे साखर वाटप करण्याचा निर्णय सरपंच,उपसरपंच व सर्व सदस्यांनी एकमताने ऐतिहासिक निर्णय घेऊन महाराष्ट्र राज्यात आदर्श घालून दिला आहे. सौंदाळा गावातील एकुण 2700 नागरिकांना याचा थेट फायदा झाला आहे.
मागिल वर्षी औरंगाबाद जिल्ह्यातील आदर्श गाव पाटोदा ग्रामपंचायतने 35 रुपये प्रतिकिलो मिळणारी साखर 20 रुपये प्रतिकिलो दराने वाटप केले होते. पाटोदा ग्रामपंचायतच्या एक पाऊल पुढे जात त्याच धर्तीवर परंतु मालमत्ता कर थकबाकी अथवा इतर कोणतीही अट न ठेवता सौंदाळा ग्रामपंचायतने सदर योजना राबवली आहे. सौंदाळा गावात सध्या मोफत पिठाची गिरणी, 5 रुपयात 20 लिटर थंड व शुद्ध पाणी वाटप योजना कार्यरत आहे.
अतिवृष्टीने हाता-तोंडाशी आलेल्या पिकांचे झालेले नुकसान, कोरोनामुळे ठप्प झालेली आर्थिक उलाढाल यासारख्या अनेक कारणांमुळे दिवाळी गोड करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे यासाठी ग्रामपंचायतीला 1 लाख 52 हजार रुपयांचा खर्च करावा लागला.

याबाबत बोलताना ग्रामविकास अधिकारी श्री.रेवणनाथ भिसे म्हणाले कि, दिवाळीसारखा सण गोड व्हावा या उद्देशाने साखरवाटपाचा उपक्रम राबवला. यासाठी लोकनियुक्त सरपंच सौ. प्रियंका शरदराव आरगडे, उपसरपंच सौ.रुख्मिणी मारुती आरगडे, ग्रामपंचायत सदस्य श्री.सचिन अशोक आरगडे, श्री.रामकिसन चामुटे, श्री.जगन्नाथ अढागळे, सौ.उषा बबन आरगडे,सौ.सुरेखा बाळासाहेब बोधक,सौ.सविता रेवणनाथ आरगडे, सौ.लताबाई सोन्याबापू आरगडे, श्री.कानिफनाथ विठ्ठल आरगडे यांनी परिश्रम घेतले.
सदर निर्णयाचे महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण व मृद मंत्री ना. शंकरराव गडाख, माजी आ. चंद्रशेखर घुले पाटील, जेष्ठ समाजसेवक कॉ. बाबा अरगडे, नेवासा पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे, गट विकास अधिकारी शेखर शेलार यांनी विशेष कौतुक केले.

ताज्या बातम्या

नेवासा शहरात 45 हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची 8 जनावरे पकडली

नेवासा नेवासा शहरात 45 हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची 8 जनावरे नेवासा पोलिसांनी पकडली आहेत. याबाबद पोकॉ रवि गोविंद पवार सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हंटले...

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...
error: Content is protected !!