नेवासा
तालुक्यातील सुरेशनगर परिसरात
नगर-औरंगाबाद महामार्गावर झालेल्या रस्ता अपघातात नेवासा फाटा येथील गणेश किसन गायकवाड (वय 25 वर्षे) याचा दुर्देवी मृत्यु झाल्याची घटना शनिवार दि.30 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गणेश गायकवाड हा आपल्या दुचाकीवरुन नगरच्या दिशेने चालला असताना अचानक एक मालवाहतूक गाडी वळाल्याने या गाडीची जोरदार धडक बसल्याने गणेश याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातात गणेशचा जागीच मृत्यु झाला. ही घटना सुरेशनगर शिवारात घडली असून गणेश हा नेवासा फाटा येथील रहवासी असल्याने त्याच्या अपघाताचे वृत्त समजताच सर्वञ हळहळ व्यक्त करण्यात आली. याबाबत नेवासा पोलिस ठाण्यात राञी उशीरा गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरु होती.