Thursday, January 20, 2022

कोरोनाचा पुन्हा एकदा वाढला धोका

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा धोका वाढताना दिसतोय. दिवाळी तोंडावर आली आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी दिलेला इशारा खरा ठरताना दिसतोय. दिल्ली सरकारनं ऑक्टोबर महिन्यात तपासलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या

नमुन्यांपैकी 99 टक्के रुग्णांच्या नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळून आला आहे. त्याचा Sars-CoV-2 व्हायरस आढळून आला आहे, यावरून कोरोनाच्या धोक्याचा अंदाज लावता येतो.

Sars-Cov-2 च्या डेल्टा व्हेरिएंटनं इतक्या वेगानं लोकं संक्रमित केले की, काही आठवड्यातच त्याने अल्फा व्हेरिएंटला मागे टाकलं आणि दिल्लीत कोरोनाची सर्वात विनाशकारी लाट निर्माण केली. कोरोना विषाणूचे निरीक्षण करणार्‍या संशोधकांच्या मते,

देशातील सर्वात सामान्यपणे आढळणारा प्रकार अजूनही डेल्टा आहे जो जवळपास निम्म्या नमुन्यांमध्ये आढळतो, त्यानंतर AY.4 डेल्टा स्ट्रेन येतो.कोरोनाच्या डेल्टा प्लस- AY.4.2 या नवीन व्हेरिएंटमुळे ब्रिटन आणि युरोपमधील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे.

भारतात हा प्रकार आढळून आल्यावर, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे सल्लागार डॉ. सुनिला गर्ग यांनी सांगितलं की, भारतात या प्रकाराची उपस्थिती 4 महिन्यांपासून आहे, मात्र काळजी करण्यासारखे काही नाही.

पुढे ते म्हणाले की, दुर्गापूजेमुळे केसेस वाढल्या आहेत. कोरोनाच्या या व्हेरिएंटची चौकशी केली जात आहे. हा व्हेरिएंट महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातही आढळून आला आहे.कोरोना व्हायरस AY.4.2 चे नवा म्यूटेंट भारतात सापडले असले तरी त्याची संख्या खूपच कमी आहे.

व्हायरसचे हे स्वरूप डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक धोकादायक असल्याचं मानलं जात आहे, कारण ते त्याच्यापेक्षा वेगाने पसरते. INSACOG नेटवर्क मॉनिटरिंग व्हेरिएशन्सच्या शास्त्रज्ञांनी शनिवारी ही माहिती दिली. असं मानलं जातं की, AY.4.2 मुळे ब्रिटन,

रशिया आणि इस्रायलमध्ये कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे. या स्ट्रेनमुळे मॉस्कोमध्ये पुढील आठवड्यात लॉकडाऊन लागू केलं जाणार आहे. तर इस्रायलमध्येही लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!