Thursday, January 20, 2022

सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणतात खासदार विखे यांच्या ‘त्या’ बोलण्याला काहीच अर्थ नाही

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था,नगरपंचायत व महानगर पालिका निवडणुकीत शिवसेना कदापीही भाजपसोबत युती करणार नसल्याचे सांगतानाच भाजपाचे

खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केलेले विधान हे त्यांचे वैयक्तिक मत असून याला कोणताच अर्थ नसल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (दक्षिण) प्रा. शशिकांत गाडे यांनी दिली.भाजपाचे खासदार डॉ.सुजय विखे हे काल पारनेर तालुका दौऱ्यावर आले होते.

त्यांच्या कार्यक्रमांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही हजेरी लावली होती.यावेळी बोलताना राज्यात कोणाचीही आघाडी होवो, पारनेर तालुक्यात मात्र भाजपा शिवसेना युती कायम राहणार असल्याचे विधान खासदार विखे यांनी केले होते.

याविषयी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. गाडे यांनी ‘पारनेर दर्शन’शी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.यासंदर्भात बोलताना प्रा. गाडे म्हणाले की, आगामी काळात होणाऱ्या निवडणूकांविषयी शिवसेना पक्षाची रणनीती ठरलेली आहे. नगर, सोलापूर आणि मराठवाडयाचे सेनेचे संपर्क नेते विश्वनाथ नेरूळकर

यांच्याशी बैठक देखील झाली आहे. आगामी निवडणुका शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासमवेत लढण्याचे धोरण निश्चित झाले आहे. हा फॉर्म्युला लागू न पडल्यास शिवसेनेची स्वबळावर लढण्याची तयारी आहे मात्र, कोणत्याही परिस्थितीत भाजपाशी युती करायची नाही असे पक्षाचे धोरण ठरल्याचे प्रा. गाडे यांनी सांगितले.

भाजपाचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या कार्यक्रमांना पारनेर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रा. गाडे म्हणाले की, कार्यक्रमांना उपस्थित राहणे वेगळे आणि निवडणुकीचे धोरण वेगळे असते असेही ते म्हणाले.

पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा आणि निवडणुकांचा संबंध नसल्याचे गाडे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.कोणत्याही परिस्थितीत भाजपाला सोडून निवडणुका लढवण्याची रणनीती शिवसेनेने यापूर्वीच आखलेली आहे त्यामुळे भाजपाचे खासदार डॉ. विखे पाटील यांच्या बोलण्याला काहीच

अर्थ नसल्याचे सांगताना प्रा. गाडे म्हणाले की, खासदार विखे हे प्रत्येक तालुक्यात वेगवेगळी विधाने करीत आहेत. नगर तालुक्यात झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना खासदार विखे म्हणाले की, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले कोणत्याही पक्षात गेले

तरी आमची अंतर्गत युती कायम राहणार आहे. त्यांना आम्ही मदत करणार आणि ते आमदार होणारच अशा प्रकारचे विधान खासदार विखे यांनी केल्याचे प्रा. गाडे यांनी सांगत त्यांच्या बोलण्याला कोण रोखणार असा सवालही त्यांनी केला.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!