माय महाराष्ट्र न्यूज : दिवाळी सणामुळे जवळपास सर्वच लहान-मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या बंद आहेत.अशातच सोयाबीनचे दर हे गेल्या तीन दिवसांपासून स्थिर आहेत. कधी नव्हे ते या हंगामात सोयाबीनचे दर हे स्थिर राहिलेले आहेत. ऐन सणामध्ये तेलाच्या मागणीत वाढ झाल्याने दर सुधारले
असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणने आहे. मात्र बाजार समित्या ह्या बंद असल्याने शेतीमालाची विक्री करावी कुठे हा प्रश्न कायम आहे. पण ज्या ठिकाणी शेतकरी केंद्र किवां तेल प्रक्रिया उद्योग सुरु आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सोयाबीनची विक्री शक्य आहे. मात्र, यंदाच्या हंगामात दर वाढले तर विक्रीसाठी
मोकळीक नाही अशी अवस्था सोयाबीनची आहे.
गतआठवड्यात सोयाबीनचे दर हे 5 हजारापेक्षाही कमी झाले होते. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणूकीवर भर दिला होता. परिणमी उडदाची आवक ही वाढली होती. गेल्या दोन दिवसांपासून
कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या दिवाळी सणामुळे बंद आहेत. तर सोयाबीनला 5 हजार 300 चा दर मिळत आहे. हाच दर कायम राहण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.दिवाळीमुळे राज्यातील बाजार समित्या ह्या काही दिवस बंद राहतात. नाशिक बाजारपेठ ही सलग 10 दिवस बंद राहणार
असल्याचे सुरवातीच्या काळात सांगण्यात आले होते. त्याचा परिणाम हा इतर बाजार समित्यांवर झाला होता. शनिवारी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची 50 हजार पोत्यांची आवक झाली होती. तर दर हा सरासरी 5 हजार रुपये मिळाला होता.
सध्या सणासुदीचे दिवस आहेत. शिवाय डाळीसाठ्यावरील निर्बंधाची मर्यादा ही संपलेली आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योग कारखान्यांकडून सोयाबीनची खरेदी सुरु आहे. शिवाय सध्या सणामुळे तेलाच्या मागणीत वाढ झाल्यानेही दर वाढत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितलेले आहे.
सोयाबीनचे दर हे स्थिरच नाही तर सुधारत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा आता उंचालवलेल्या आहेत. हेच दर कायम राहण्याची आशा शेतरकरी बाळगत आहेत.